जळगाव जामोद शहरातील ओला-सुका कचरा संकलित न केल्यास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या केबिनमध्ये आणून टाकणार / नगरसेवक रमेश ताडे
गजानन सोनटक्के जळगाव जा – जळगांव जामोद येथील कर्तव्यदक्ष नगरसेवक रमेश भाऊ ताडे यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की जळगाव जामोद शहराचा ओला सुका कचरा संकलित करून तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण क्षपण भूमीवर पोहोचविणे अशा पद्धतीचा कंत्राट न.प.णे अक्षय देशमुख यांना अंदाजे 79 लक्ष रुपयात दिला असून, परंतु संबंधित कंत्राटदार कोरोणा महामारीच्या काळामध्ये व पावसाळी सदृश्य परिस्थिती लक्षात घेता साफसफाई करुन ओला-सुका कचरा विलगीकरण करून शपन भूमीवर पोहोचविणे याकरिता ठरवून दिलेल्या अंदाजपत्रकामध्ये एकूण प्रभाग 9 असून प्रभाग निहाय नऊ वाहने बारा मजूर व व सोबत 12 नगरपालिकेचे सफाई कामगार यांचेमार्फत गावच्या आरोग्याचे हिताच्या दृष्टिकोनातून नेहमी संकलन होणे गरजेचे आहे परंतु संबंधित कंत्राटदार व नगरपालिका प्रशासन यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी यांनी घंटा गाड्यांची संख्या कमी करून मजूर कमी करून नियमित ओला सुका कचरा ठरल्याप्रमाणे संकलित न करता मनमानी करून नगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढले आहे.
याबाबत नगरपालिका प्रशासन पूर्णतः उदासीन असून जनतेच्या आरोग्याची खेळ करत आहेत याबाबत सन्माननीय नगरसेवक तथा तालुका प्रमुख शिवसेना गजानन भाऊ वाघ यांनी सुद्धा बरेच वेळा ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे संबंधित कंत्राटदार यांनी नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे या बाबत 80 हजार रुपयांचा दंड सुद्धा ठेकेदाराला आकारण्यात आला आहे नगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही स्वतः जनतेच्या निरोगी आयुष्यासाठी व आरोग्यासाठी गावातील ओला-सुका कचरा संकलित करून साफसफाई करून सदर गोळा झाला पूर्ण गावातील कचरा मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कार्यालयांमध्ये आणून टाकणार असा गर्भित खणखणीत इशारा कर्तव्यदक्ष नगरसेवक रमेश भाऊ ताडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज या निवेदनाद्वारे दिला आहे, यामुळे होणाऱ्या परिणामास नुकसाना स नगरपालिका प्रशासन व संबंधित कंत्राटदार हेच जबाबदार राहतील.. अशा आशयाचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आलेले आहे, या निवेदनावर विशाल भाऊ पाटील युवा सेना शहर प्रमुख ,मंगेश भाऊ कातोरे उपशहर प्रमुख, संकेत रहाटे विद्यार्थी सेना संपर्कप्रमुख, पवन वाघ ,सचिन वाघ ,गोपाल ढगे, यांच्यासह यांचे निवेदन आज यांनी जनतेच्या व नगरपालिकेच्या आर्थिक व आरोग्याच्या हिताचे दृष्टीने नगरपालिका प्रशासनाला दिले आहे..