Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते बायपॅप मशीन चे वितरण.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोदला भेट दिल्या 3 बायपॅप मशीन…

SANJAY KUTE

जळगांव जा.ता.प्रतिनिधी गजानन सोनटक्के :- कतार येथे वास्तव्यास असलेले आ. डॉ. संजय कुटे यांचे बंधू विनोद कुटे यांच्या माध्यमातून लखनऊ येथील श्रीजान-एक सोच या संस्थेद्वारे ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथील डॉक्टर व स्टाफला अतीशय उपयुक्त अश्या 3 बायपॅप मशीन चे मोफत वितरण आज दिनांक 13 जुलै रोजी आ. डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे लवकरच ऑक्सीजन प्लांट सुरू होऊन दहा बेडचे आय सी यु वॉर्ड 3 नवीन व्हेंटिलेटर सह जनतेच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. त्याकरिता सदर बायपॅप मशीन रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. लखनऊ येथील आरोग्य सेवा, स्किल डेव्हलपमेंट, शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या श्रीजान एक सोच या संस्थेचे ग्रामीण भागातील विविध उपक्रमांना यापुढेही असेच सहकार्य आपल्या भागात मिळत राहणार असल्याने आमदार डॉ. संजय कुटे यांनी त्यांचे बंधु विनोद कुटे व श्रीजान संस्थेचे मनःपूर्वक आभार यावेळी मानले.यावेळी सौ सीमाताई डोबे नगराध्यक्षा, नंदकिशोर अग्रवाल, रामदासजी बोंबटकार,सचिन देशमुख,अभिमन्यू भगत,गजानन सरोदे,राजेश गोटेचा,आशिष सारसर,अनिल कपले, सुरेश इंगळे,रमेश कोथळकार, डॉ दीपक केदार, डॉ नंदूभाऊ तायडे,गौरव डोबे,अक्षय देशमुख, यांसह ग्रामीण रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.