Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

केंद्र सरकारच्या सतत च्या दरवाढी मूळे सर्वसामान्य जनता त्रस्त. डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर.

RALLY

गजानन सोनटक्के जळगाव जा – केंद्रातील भाजपा सरकार च्या अवास्तव इंधन दरवाढ विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्यभर आंदोलन सुरू आहे.तर या इंधन दरवाढ विरोधात जळगांव जा येथे सुद्धा सायकल रॅली तथा स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.पेट्रोल डिझेल गॅस च्या भावात वेळोवेळी वाढ झालीय त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे हाल होत आहेत. आता सर्व जनता या सरकारला कंटाळली असून त्याचा च भाग म्हणून आज काँग्रेस पक्ष्यातर्फे आयोजित रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी काँग्रेस च्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील, किसान सेल चे जिल्ह्याध्यक्ष राजू पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, युवक चे विधानसभा अध्यक्ष शे. अफरोझ, नगरसेवक सर्वश्री श्रीकृष्ण केदार, चित्राताई इंगळे, ऍड.संदीप मानकर, कलीम मिस्त्री, देविदास सावरकर,युवक चे शहराध्यक्ष राजीक भाई, सेवादल चे प्रमुख अच्छेखा, मडाखेड सरपंच राजू शित्रे, पिंपळगाव सरपंच कळस्कार ताई , अकोला खुर्द सरपंच वसंताभाऊ बोदडे, वसंत धुर्डे, जामोद उपसरपंच सलामखा, प्रेम जयस्वाल, किसना दामधर, बब्बूभाऊ,सै. हुसेन, अल्पसंख्याक चे शहराध्यक्ष राजू मुल्लाजी, शे.जुनेद, इ मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली प्रमूख मार्गाने मार्गक्रमण करीत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत पेट्रोल पंपावर संपन्न झाली.

स्वाक्षरी अभियान युवक काँग्रेस च्या वतीने सुरू आहे त्यास नागरिकांचा, सर्वसामान्य लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कारण सर्वांना या महागाईचे चटके या केंद्रातील भाजपा सरकारमुळे भोगावे लागत आहेत.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका व शहर काँग्रेस, महिला काँग्रेस ,युवक काँग्रेस, अल्पसंख्याक कॉग्रेस , सेवादल काँग्रेस च्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले. यात दिनेश काटकर, शे.हुसेन, बाळू इंगळे, देविदास सावरकर, साहेबराव तायडे, अमोल मानकर, इमरान भाई, मारोती धुर्डे, महादेव मिसाळ, गणेश पुंडे, अस्लम भाई, शे.जावेद,आवेश, शहनावाझ, आमीन, राजा जमादार, अस्लम खान, सैफउल्लाखान, अमोल हागे, प्रशांत वंडाळे इ.कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.