Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अखेर त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी १ लाख रुपये आर्थिक मदत.

गजानन सोनटक्के जळगांव जा.ता.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकाश केदार तसेच ईलोरा येथील ज्ञानेश्वर नारायण तिजारे या शेतकऱ्यांनी सततची नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.

1LAKH MADAT

यातील ज्ञानेश्वर नारायण तिजारे या शेतकऱ्यांने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या खिशामध्ये एक चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचे कारण लिहल होत.त्या चिठ्ठी मध्ये त्यांनी मी आत्महत्या करण्याचे कारण असे आहे की माझ्याकडे 3 ते 3.5 लाख कर्ज असून माझ्याकडे एक एकर शेती आहे त्या एक एकर शेतीमध्ये मी यावर्षी सोयाबीन पिकाची लागवड केली होती. परंतु सततचा पाऊस व सततची नापिकी असल्यामुळे मला या एक एकर शेतीमध्ये एक ते दीड क्‍विंटल सोयाबीन झाल त्या एक ते दीड क्विंटल सोयाबीन मध्ये मी माझ्या कर्जाचा भरणा कसा करायचा आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.परंतु आत्महत्या करीत असताना मला एक दुःख वाटतं की माझा एकुलता एक मुलगा आकाश याच्या खांद्यावरती मी या कुटुंबाची जबाबदारी देऊन या जगाचा अखेरचा निरोप घेत आहे.आकाश बाळा खूप मोठा हो खूप शिक आणि कर्जबाजारीपणामुळे मी तुझे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही अशी भावनिक चिठ्ठी लिहून या शेतकऱ्यांनी झिंक फॉस्फेट घेऊन या जगाचा अखेरचा निरोप घेतला.परंतु असे असून सुद्धा ह्या दोन्ही केसेस शासनाने अपात्र ठरवलेल्या होत्या परंतु या दोन्ही आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळावा याकरता जळगांव जामोद तालुका युवा सेनेचे अक्षय भाऊ पाटील यांनी सतत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करून या दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना एक एक लक्ष रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून मिळवून दिली.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मंडळ अधिकारी मुंडे साहेब तसेच चोपडे साहेब यांनी शासनाच्या वतीने त्यां शेतकऱ्यांच्या पत्नीना चेक प्रदान करण्यात आले .यावेळी या दोन्ही कुटुंबाकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देल्याबद्दल अक्षय पाटील यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी सुनगाव येथील तलाठी केदार, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.