चिखली तालुक्यातील शेलगाव आटोल मध्ये ग्रामपंचायत मार्फत करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण गावात ट्यांकर चे साहाय्याने संपुर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आले.
मागील काही दिवसात गावात कोरोना ची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती व ऋग्णसंख्या वाढत होती. स्थानिक आरोग्य केंद्र, डॉक्टर व गावकऱ्यांच्या सहकार्याने येथील रुग्नसंख्या आटोक्यात आणण्यात यश आले. परिस्थिती आता आटोक्यात असुन गावकऱ्यांनी गाफील न राहता आरोग्याची काळजी घ्यावी व नियम काटेकोपणे पाळावे असे आरोग्य विभाकडून सांगण्यात आले यावेळी सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत मार्फत संपुर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्यात आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Related Posts