Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पोषण महिन्यातील कार्यक्रमांमधून महिलांमध्ये पोषणविषयी जनजागृती करावी


–         जि.प अध्यक्ष

  •  पोषण महिना कार्यक्रमाचे उद्घाटन
  • महिनाभर ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा स्तरावर चालणार कार्यक्रम

बुलडाणा, दि. 2 : शासनाने महिलांमध्ये पोषण वृद्धी वाढावी, पोषण विषयक जनजागृती व्हावी या उद्देशाने सप्टेंबर महिन्यात पोषण महिना हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य, महिला व बालविकास व अन्य संबंधीत यंत्रणांनासुद्धा ग्राम स्तरावर महिला व बालकांसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व संबंधीत यंत्रणांनी सप्टेंबर महिन्यात विविध कार्यक्रमांमधून महिलांमध्ये पोषणविषयी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष मनीषा पवार यांनी आज केले.  

mahila

  महिला व बाल कल्याण विभाग, जि.प बुलडाणा यांच्यावतीने सप्टेंबर 2021 राष्ट्रीय पोषण महिना उपक्रमाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सभागृह, जिल्हा परिषद येथे करण्यात आले. त्यावेळी जि.प अध्यक्ष बोलत होत्या. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) श्री. रामरामे, जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या, पोषण महीना उपक्रम साजरा करायचा म्हणून करू नका. स्वत: पुढाकार घेवून जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे काम करावे. कुणाची काही वेगळी कल्पना असल्यास त्याचीही अंमलबजावणी करावी. समारोपीय कार्यक्रमात जिल्ह्याचे नावलौकिक वाढविणारी कामगिरी झालेली असल्यास निश्चितच आपला सन्मान होईल. रूपरेषेमधील परसबाग, बाळ कोपरा, आहार प्रदर्शनी, आहार प्रदर्शनीत सासु सासरे यांना निमंत्रण, रानमेवा प्रदर्शन, सुदृढ बालक स्पर्धा आयोजन आदी उपक्रम राबवावे. महिलांसाठी ॲनिमिया तपासणी शिबिरे आयोजित करावी.  तसेच महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान याप्रसंगी म्हणाल्या, जिल्ह्यात काही अंणवाड्यांमध्ये चांगल्या पद्धतीने परसबाग निर्माण करण्यात आली आहे. मात्र या परसबागेला कुंपन देण्यात यावे. महिलांना या पोषण महिना कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे. यावेळी राष्ट्रीय पोषण महिना आराखड्याचे विमोचन करण्यात आले.

  प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रामरामे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी पोषण महिना कार्यक्रमाचे तारीखनिहाय माहिती दिली.  तसेच पोषण महिना आयोजनामागील भूमिका विषद केली.

असा असेल पोषण महिना उपक्रम

  कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीने सॅम बालकांची आरोग्य तपासणी, सामाजिक परिक्षण, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना 100 टक्के कोविड लसीकरण, गावात लसीकरण पर्यवेक्षण व स्वच्छता जनजागृती, गरोदर माता, स्तनदा माता यांचेकरीता कोविड लसीकरण, अंगणवाडी केंद्रांना 100 टक्के नळ जोडणी व भांडे स्वच्छ करणे, कोरडा दिवस पाळणे, परसबागेची आखणी व नियोजन, बाळ कोपरा तयार करणे, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, गरोदर महिलांना समुपदेशन करण्याकरीता अंगणवाडीच्या समन्वयाने गृहभेटी, शिक्षक दिनानिमित्ताने 5 सप्टेंबर रोजी  माझे गुरू या विषयावर भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धांचे आयोजन, माझे मुल, माझी जबाबदारी अंतर्गत मुलांची कोविड लक्षण तपासणी, गरोदर मातांना आरोग्य व पोषण तसेच आयएफए टॅब्लेट बाबत गृहभेटी, सॅम बालकांची स्क्रीनींग करणे, आहार प्रदर्शनी आयेाजन, 3 ते 6 वर्ष वयोगटात बालकांना ऑनलाईन पद्धतीने पुर्व शालेय शिक्षण देणे, सुदृढ बालक स्पर्धा, तरंग सुपोषणमध्ये 100 टक्के नोंदणी व जनजागृती करणे, किशोर मुली तसेच नवविवाहीत महिला यांना आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे, सोशल मिडीयावर पोषणविषयक कॅम्पेन करणे, बागेतील भाजीपाला गरोदर व स्तनदा माता यांना वाटप करणे, समुदाय आधारीत कार्यक्रमातंर्गत पहिल्या तिमाहीत गरोदर मातेची नाव नोंदणी व गरोदर पणात घ्यावयाची काळजी, सामाजिक लेखापरीक्षण व विविध स्पर्धा, परसबागेतील हंगामी भाज्यांबाबत माविम सोबत वेबिनार, भारतीय आहारतज्ज्ञ सोबत वेबिनारचे आयोजन, अंगणवाडीमध्ये आहाराचे प्रात्याक्षिक करणे, आहार प्रदर्शनी आयोजन, तीन लाडू उपक्रमाबाबत मार्गदर्शन, बेटी बचाओ, बेटी पढाओ बाबत जनजागृती व विविध स्पर्धा, माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी प्रचार व प्रसिद्धी, किशोरींची एचबी तपासणी व मार्गदर्शन, बाळाचे 1000 दिवसांचे महत्व याबाबत मार्गदर्शन, अंगणवाडी व परीसर स्वच्छता, सॅम बालकांना गृहभेटी, क्षेत्रीय पर्यवेक्षण व परसबाग भेटी, आयसीडीएस सेवांविषयी जनजागृती, किशोरींना अस्मिता योजनेवियी माहिती व तरंग सुपोषित बाबत जनजागृती, पोषण थाळी, आहार प्रदर्शनीमध्ये रानभाज्या व रानमेवा याचे महत्व विशेषत: सासु सासरे यांना निमंत्रीत करण्यात येणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.