Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जुन महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा

बुलडाणा, दि. 17 :  आरोग्य विभागातर्फे जुन-2021 हा महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.  या महिन्या विविध कार्यक्रमा अंतर्गत घरोघरी डेंगू, मलेरीया विषयी कंटेनर सर्व्हेक्षण सुरु करण्यात आल आहे. आरोग्य कर्मचारी हे घरोघरी जावून माहिती पत्रक वाटप करुन डास अळी सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे कार्यक्रम करीत आहे. विशेष डासामार्फत प्रसारीत होणारे हत्तीरोग, डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया या रोगाच्या नियंत्रणासाठी नियमित कार्य शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत करण्यात येत आहे.

maleriya

   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.बाळकृष्ण कांबळे, जिल्हा हिवताप अधिकारी, शिवराज चौहाण यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात येत आहे. साथरोग नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जेणे करुन या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल. डेंग्यु सारख्या रोगावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे तसेच हा रोग जिवघेणा असल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक योजना राबविणे हा एकच योग्य मार्ग आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे डासांची पैदास होवून आजार पसरण्याची भिती वाटत आहे. डासांमार्फत होणारे आजार दूर करण्या करिता आरोग्य विभाग सज्ज आहे.

    आशा बळकटी करणात अशांना रक्त नमुना घेणे, कंटेनर सव्हेक्षण करणे, डास उत्पत्ती स्थाने शोधणे, गप्पी मासे सोडणे, संडासच्या गॅस पाईपला जाळया बसविणे या विषयी माहिती देण्यात आली. नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा, झोपताना मच्छरदानीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावे, दाराला व खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, ताप आल्यास रूग्णालयाशी संपर्क साधावा, भंगार साहित्य, टायर्स, कुलर्स, नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टीकची तुटलेली भांडी, गाडगे, मडके आदी सर्व वस्तू नष्ट कराव्यात. या मोहिमेत आरोग्य सहायक श्री. पाखरे, आरोग्य सेवक श्री. बाहेकर, श्री. जुमडे, श्री. वनारे, श्री. जाधव, श्री. पडोळकर, श्री. इंगळे आदीनी सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.