संग्रामपुर [ प्रतिनिधी ]- ऑगष्ट क्रांती दिना निमित्त व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्यर्थ न हो बलीदान या अभियाना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे सुचने नुसार जळगाव जामोद युवक कॉंग्रेस व संग्रामपूर तालुका युवक कॉंग्रेस तर्फे सोनाळा येथे मशाल मार्चचे आयोजन करण्यात आले होते बस स्टॅण्ड सोनाळा येथुन मार्च सुरू करण्यात आला
तर कोळी पुरा, प्रकाश बाबा चौक मार्गे संत तुकाराम महाराज चौक येथे पोहोचेला.या ठिकाणी गजानन महाराज संस्थान चे विश्वास स्व शिवशंकर पाटील, भाई गणपतराव देशमुख, नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नंतर मशाल मार्च महात्मा फुले चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्रद्धांजली पर समायोचित भाषने झाल्यानंतर मशाल मार्च ची सांगता झाली
यावेळी डॉ स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील, राजेंद्र वानखडे, प्रकाश देशमुख, अविनाश उमरकर, संजय ढगे,राजेश्वर देशमुख, अभिजित अवचार,शेख अफरोज, सुरेश हागे, जाहेर अली, जगन्नाथ विश्वकर्मा, शिवकुमार गिरी, अभय मारोडे,शेख़ राजीक संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.