Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

संग्रामपूर शहर विकास कामासाठी नगर पंचायतला ५० लाख निधी देणार – आ बाजोरिया

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] – शहरातील विकास कामे करण्यासाठी संग्रामपूर नगर पंचायतने कृति आराखडा तयार करुन निधी मांगणीचा प्रस्ताव त्वरित सादर केल्यास नगर पंचायत प्रशासनाला लवकरच ५० लाख रु विकास निधी देणार असल्याचे आश्वासन आमदार गोपीकिसन बाजोरीया यांनी नगर पंचायतला भेट प्रसंगी दिले . आ बाजोरिया यांनी नगर पंचायतला भेट देऊन प्रशासकीय आढावा घेतला . स्थानीक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार असलेले बाजोरीया यांचा सत्कार यावेळी नगर पंचायत प्रशासनाच्यावतीने करण्यात आला .

sangrampur

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले स्थानीक विकास कार्यक्रमा अंर्तगत ५० लाख रुपये निधी लवकरच देऊ यासाठी विकास कामांचा कृती आराखडा व निधी मागणीचा प्रस्ताव लवकरच सादर करा असे निर्देश त्यांनी यावेळी नगर पंचायत प्रशासनाला दिले . काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले आमदार बाजोरीया यांचा नगर पंचायत प्रशासन ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार केले.

यावेळी गटनेते आनंद राजनकर नगरपंचायत चे मुख्यधिकारी रेखा वाणी , माजी नगरसेवक रामेश्वर गावंडे , उपाध्यक्ष सै आसिफ सै खलिल, पंकज तायडे, सुनिस पा.राजनकर, संतोष म्हसाळनगरपंचायताचे कार्यालय अधिकक्ष शरद कोल्हे, रोखापाल गोरे , कर्मचारी नाना मानकर , विठ्ठल वानखडे आदी कर्मचारी नागरीक उपस्थीत होते

Leave A Reply

Your email address will not be published.