Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

दुध प्रकिया व पशुसंवर्धन उद्योगांना 90 टक्के कर्ज; 3 टक्के व्याजात सूट

  • पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना
  • लाभ घेण्याचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 2 : सन 2020-21 वर्षापासून केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना या नवीन योजनेस मंजुरी दिली आहे. सन 2021-22 या वर्षात योजनेसाठी 15 हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, योजनेसंदर्भात वांरवार उपस्थित होणारी प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाचा अर्जाचा नमुना आणि यादी आदी माहिती http://dahd.nic.in/ahdf या केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडील पोर्टलवर उपलब्ध आहे. योजनेतंर्गत दूध प्रक्रिया व पशुसंवर्धन क्षेत्रात आईस्क्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चरायझेशन, दूध पावडर, मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती व प्रक्रिया, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व्याजदरांमध्ये तीन टक्के सूट देण्यात येणार आहे.

MILK

    या सोबतच लिंग निश्चिती वीर्यमात्रा निर्मिती,  बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन या बाबींचा समावेश केलेला आहे. जिल्ह्यातील व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या आदींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी http:// dahd.nic.in/ahdf या केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडील पोर्टलवर  ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे, तरी इच्छूक शेतकरी उत्पादक संस्था, व्यक्तीगत व्यावसायिक, खाजगी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या आदींनी ऑनलाईन प्रस्ताव सदर संकेतस्थळावर पाठवावे व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. के. एम ठाकरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.