Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मोबाईल दुकाने फोडणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखाचे जाळयात

MOBILE CHOR

रवींद्र सुरूशे – ८ जुने रोजी मोबाईल दुकाने फोडणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखा , बुलडाणाचे जाळयात मा.पोलीस अधिक्षक श्री अरविंद चावरिया साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री बळीराम गिते साहेब यांचे आदेशाने मालमत्ते विरुध्दच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी दि .०८ / ०६ / २०२१ रोजी एक पथक नेमण्यात आले सदर पथक पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की , पोस्टे चिखली येथे दाखल असलेला अप क्र . ३१२/२०२१ कलम ४६१,३८० भादवि चा गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले वेगवेळ्या कंपनीचे ५ मोबाईल चोरुन नेणाऱ्या आरोपीची गोपनीय माहिती मिळाल्याने आरोपी नामे संघर्ष उर्फ नक्या किशोर पवार वय २१ वर्ष रा.सिध्दार्थ नगर चिखली हयास ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन गुन्हयात चोरी गेलेला मुददेमाल व इतर ठिकाणाहुन चोरुन आणलेले एकुन ८ मोबाईल फोन कि . १६,००० / – रु चे सदर आरोपीकडुन जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला . व सदर आरोपीस पोस्टे चिखली यांचे ताब्यात देण्यात आल आहे . सदर कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री अरविंद चावरिया साहेब , अपर पोलीस अधिक्षक श्री बजरंग बनसोडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांचे आदेशाने , पोउपनि श्रीकांत जिंददमवार , पोहेकॉ गजानन अहेर , पोकॉ विजय सोनोने गजानन गोरले , चालक सुधाकर बडे यांचे पथकाने पार पाडली .

Leave A Reply

Your email address will not be published.