Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पावसाने विहीर कोसळून खुदनापूर येथील शेतकऱ्यांची 6 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान

VIHIR

मेहकर – मेहकर तालुक्यातील खुदनापूर येथील शेतकरी निंबाजी आत्माराम लखाडे यांच्या शेतातील विहीर कोसळून 6 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे खुदनापूर येथील शेतकरी निंबाजी लखाडे यांच्या मालकीची जमीन गट नंबर 10 क्षेत्रफळ 2 हेक्टर असून त्यांनी या वर्षी विहीर खोदकाम पूर्ण करून बांधकाम केले होते विहीर 36 फूट रुंद व 50 फुट खोल होती 6 जून रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी घुसून त्यामध्ये विहिरीचे बांधकाम पूर्णपणे कोसळले आहे विहीर कोसळल्यामुळे विहिरीतील मोटर पंप सुद्धा बुडाला आहे त्यामुळे त्यांचे अंदाजे 6 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीबाबत तलाठी जि एस सोळंके यांनी आज 8 जून रोजी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करून वरिष्ठाकडे अहवाल पाठवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.