जळगांव जा.प्रतिनिधी गजानन सोनटक्के – जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या इस्लामपूर शेत शिवार मध्ये एका मतिमंद युवतीवर वडोदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव खान्देश येथील 70 वर्षीय देविदास ओंकार बोंबटकार या आरोपीने मतिमंद युवतीवर दोन वेळा अत्याचार करून अर्भक जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मतीमंद युवतीवर दोन वेळेस अत्याचार केले होते त्यामुळे मतीमंद युवतीला त्याच्यापासून दिवस गेले होते. सदर मतिमंद युवती शेतामध्ये दररोज पाणी आणण्याकरिता जात होती.असे तिचे बयान तज्ञांच्या मदतीने घेण्यात आले. ही मतीमंद युवती शेतात पाणी आणण्यासाठी जात असल्याचा फायदा घेत संधी साधुन आरोपीं देविदास बोंबटकार याने सदर युवतीवर दोन वेळा अत्याचार केले होते. त्यानंतर त्या मतिमंद युवतीला दिवस गेल्याचे समजतात आरोपींने तिला औषध गोळ्यां देवुन पोटातील बाळ जबरदस्तीने पाडण्यात आले होते.ते बाळ एका मुलीचे अर्भक होते त्यानंतर आरोपी देविदास बोंबटकार याने साथीदार सुभाष मालसिंग सस्त्या यांच्या मदतीने त्या अर्भकाला जाळून टाकले असे आरोपींची चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाले आरोपीची चौकशी जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांनी केली आहे. तसेच त्यांनीच या घटनेची फिर्याद दिनांक 18 जून रोजी रात्री उशिरा जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून या दोन्ही आरोपी विरुद्ध अपराध नंबर 491/2021 कलम 376,(2)(एल),(एन),315,318, भारतीय दंडविधान अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर यांनी दाखल करून घेतला पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश आडे हे पुढील तपास करीत आहेत.