दिव्यांगांचे सहज,सुलभ व प्राधान्याने लसीकरण करावे – रंगोली पडघान यांची मा.जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी.

बुलडाणा – मा.जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे कडे राष्ट्रवादी युवती काँग्रेस बुलढाणा च्या वतीने बुलडाणा जिल्ह्यातील दिव्यागांना सहज, सुलभ व प्राधान्याने लसीकरण मोहीमेत सहभागी करून घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली .
बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंञी तथा अन्न व औषध प्रशासन मंञी मा.ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्षा मा. सक्षणाताई सलगर यांच्या सुचनेनूसार राष्ट्रवादी युवती काँग्रेस बुलढाणा शहराध्यक्ष रंगोली पडघान यांच्या वतीने दिव्यांगांना लसीकरणा दरम्यान होणारा त्रास लक्षात घेत तसेच कोरोना विषाणूला हरविण्यासाठी राज्यशासन व प्रशासन यांनी सुरू केलेल्या लसीकरण मोहीमेचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळावा याकरिता मा.एस रामामुर्ती साहेब मा.जिल्हाधिकारी , बुलडाणा यांचे कडे मागणी करण्यात आली असून मा.जिल्हाधिकारी यांनी या बाबत योग्य ती काळ्जी घेतली जाईल, असे आश्वासन संबंधितांना दिले.
यावेळी रंगोली पडघान, (शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस बुलढाणा) शहरउपाध्यक्ष मनिषा कुडके, शहरकार्याध्यक्ष पल्लवी वायाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष अनिल बावस्कर आदींनी निवेदनाद्वारे दिव्यांग व्यक्तींसाठीची ही मागणी केली आहे .