Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

डिझेल पेट्रोल खत दरवाढी तात्काळ कमी करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

चिखली :- केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमती बेसुमार वाढल्याने तसेच डिझेल पेट्रोलचे भाव शंभरी पार करीत असल्याने केंद्र सरकारचा तीव्र निषेध करून माननिय जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय तहसीलदार साहेब यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले तसेच देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दररोज बेसुमार वाढ होत असून पेट्रोलने देशात शंभरी पार केली आहे त्यातच केंद्रातील सध्याच्या भाजपा सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.

CHIKHALI NCP


केंद्र सरकारने रासायनिक खताच्या 10:26:26 ची किंमत प्रति 600 रुपयांनी तर डीएपीची किंमत प्रति भाग 715 रुपयांनी वाढवले त्यामुळे करोणाच्या महामारीत अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सध्याच्या भाजपा केंद्र सरकारने केले आहे केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस चिखली तालुक्याचे वतीने तीव्र शब्दात निषेध करीत आहेत ही झालेली दरवाढ केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीच्या वतीने तालुका जिल्हा तसेच महाराष्ट्र स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शंतनू भारत बोंद्रे विधानसभा अध्यक्ष शंतनू पाटील तालुकाध्यक्ष गजानन वायाळ शहराध्यक्ष रवींद्र तोडकर युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे ओबीसी सेलचे अध्यक्ष सुभाष देवडे पालकमंत्री यांचे स्वीय सहाय्यक संतोष लोखंडे शहर उपाध्यक्ष निमराव देशमुख प्रमोद पाटील सेवादल अध्यक्ष माजी प्रमोद चिंचोले सदानंद मोरगंजे प्रशांतभैय्या डोंगरदिवे जिल्हा सरचिटणीस भगवानराव काळे दिपकराव मस्के रामभाऊ खेडेकर डॉक्टर प्रकाश शिंगणे प्रशांत इकडे बाळासाहेब पवार डॉ विकास मिसाळ सतीश बाहेकर प्रफुल्ल भुतेकर प्रवीण घड्याळे प्रशांत झिने राजेश गवई गणपतराव गायकवाड रामेश्वर उबाळे रहीम पठाण विजय अंभोरे अनिल कणखर अनिल वाघ दीपक काळे नंदु अंभोरे प्रविण लहाने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या निवेदनावर सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.