दि.१७/०५/२०२१ संग्रामपूर
सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीशी झगडत असताना अशातच देशामध्ये पेट्रोल,डीझल व गॅस च्या किमती बेसुमार वाढत आहे.पेट्रोलने तर शंभरी पार करून टाकली आहे. आणि अशातच केंद्रातील भाजप सरकारने रासायनिक खतांच्या बेसुमार किमती वाढवून शेतकऱयांना मोठा झटका दिला आहे.केंद्र सरकारने रासायनिक खत १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६००/ रुपयांनी तर डी. ए. पी.ची किंमत प्रती बॅग ७१५/रुपयांनी वाढवली आहे.त्यामुळे कोरोनाच्या महामारीत हवालदिल झालेल्या शेतकऱयांचे कंबरडे मोडण्याचे पाप केंद्रातील भाजप सरकार ने केले आहे.पक्ष प्रदेशाध्यक्ष मा ना जयंतराव पाटील साहेब यांच्या आदेशानुसार, आदरणीय ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब पालकमंत्री बुलडाणा तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य ,आदरणीय जिल्हाध्यक्ष Adv.नाझेर काझी साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली
केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करीत आहोत. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल अशा आशयाचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संग्रामपूर तालुक्या कडुन मा.जिल्हाधिकारी साहेबांना तहसीलदार संग्रामपूर यांच्या मार्फत निवेदन ऑनलाइन पद्धतीने देण्यात आले.

यावेळीराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायण ढगे, माजी जिल्हापरिषदेचे संगीततरा भोगंळ उर्फ राजुभाऊ पाटील, माजी संग्रामपूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तुकारामभाऊ घाटे, सेवादल तालुकाध्यक्ष राजेश आमटे, रा.काँ.जिल्हा संघटक बाळुभाऊ साबे,संजय गावंडे,शहरध्याक्ष राजेश गिरी,पळसोडा सरपंच सदाशिव कुचेकार, इरशाद सुरत्ने,सुदर्शन घिवे, सिध्दार्थ गाडे, पप्पू पठाण, युवकचे महादेव पिसे , अशोक पाटील, दुर्गासिंग सोळंके, आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हाेते