Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मागील वर्षी अतिवृष्टिमुळे नुकसान झालेले तालुक्यातील शेतकरी आजही पिक विम्यापासुन वंचीत …

शेतकर्याची विमा रक्कम जमा करा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांची कृषी आयुक्तांकडे मागणी

बुलढाणा – प्रधानमंत्री पिक विमा योजना सन२०२०-२१अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य शेतकर्यानी पिक विमा काढलेला होता. परंतु काहिंना अतिशय तोकडी मदत मिळाली तर आजहि नदिकाठचे व इतर पिक विमा काढलेले शेतकरी नुकसान भरपाई मिळणे पासुन वंचित राहले असल्याने चिखली तालुक्यातील नदिकाठावरील नुकसानग्रस्त सोनेवाडी,सोमठाणा,दिवठाणा व इतर गावातील वंचीत शेतकरी यांची विमा रक्कम देण्यात यावी,त्याचप्रमाणे विमा काढलेल्या वंचीत शेतकर्याची विमा रक्कम खात्यावर अदा करावी,अशी मागणी स्वाभिमानी चे राज्याचे नेते तथा माजी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कृषी सचिव,कृषी आयुक्त यांच्याकडे विनायक सरनाईक यांनी दि१७आॅगस्ट २०२१ रोजी केली आहे.


प्रधानमंत्री पिक विमा योजना सन २०२०-२१अंतर्गत तालुक्यातील असंख्य शेतकरी यांनी सोयाबीनसह इतर शेती पिकाचा विमा काढलेला होता.त्याचप्रमाणे मौजे सोनेवाडी येथील 206 आणि सोमठाणा येथील100शेतकरी यांनी पिक विमा काढलेला होता. १७आॅगस्ट २०२०रोजी व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे नदिकाठावरील वरील गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.तर तालुक्यातही सततधार पावसामुळे अशीच परीस्थीती ओढावली होती.असे असतांना शासनाकडुन पंचनामे करुण नुकसानग्रस्त शेतकरी यांना विमा रक्कम अदा करावी अशा सुचना देण्यात आल्या होत्या काहिंना रक्कम मिळाली परंतु यामधे आॅनलाइन तक्रारीचा खोडा घालुन अनेक शेतकरी आजही विमा मिळणेपासुन वंचीत राहले आहेत.शेजारील वेक्तीस विमा मिळाला तर बाजुचा नुकसानग्रस्त शेतकरी मात्र वंचीत राहला आहे.

तर अनेकांना पिक विमा रक्कम कमी प्रमाणात मिळाल्याने शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी जानेवारी महिण्यामधे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे याबाबतची मागणी केली होती.त्यावेळी कृषी विभागाकडुन विभागीय व्यवस्थापक रीलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनी ला मागण्यांच्या अनुषंघाने कळविण्यात देखील आले होते.काहिंना त्यावेळी रक्कम मिळाली तर याच्या याद्या वरीष्ठाकडे पाठवल्या असल्याचे कृषी विभागाकडुन सांगीतले जात आहे.परंतु अतिवृष्टिला वर्ष उलटले तरीसुद्धा आजही विमा काढलेले तालुक्यातील असंख्य शेतकरी विमा मदतीपासुन वंचीत असल्याने चिखली तालुक्यातील विमा काढलेल्या वंचीत शेतकरी यांच्या खात्यामधे तात्काळ विमा रक्कम जमा करण्याबाबतचे आदेश कृषी विभाग व संबंधीत कंपणीस देण्यात यावे,

कमी प्रमाणात रक्कम मिळालेल्या व नदिकाठावरील सोमठाणा,सोनेवाडी,व इतर गावातील वंचीत शेतकरी यांना विमा रक्कम अदा करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात कृषी आयुक्तालयासमोर पिक विमा संदर्भात झालेल्या आंदोलना नंतर झालेल्या बैठकी दरम्याण विनायक सरनाईक यांनी कृषी आयुक्त धिरज कुमार, यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.तर याबाबत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आली आहे.यावेळी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.