Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

उमंग युथ फाऊंडेशन, मातृतीर्थ सिंदखेडराजा आयोजित ईको फ़्रेंड्ली बाप्पा कार्यशाळा उत्साहात संपन्न.

सिंदखेडराजा : इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याची एकदिवसीय कार्यशाळा येथील गोसविनंदन गणपती मंदिरात पार पडली.उमंग युथ फाऊंडेशनचा वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.


प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणेश किंवा दुर्गा मूर्ती बनविण्याची आपल्या कडील पद्धत पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ठरत आहे. पॅरिस ची ही माती पाण्यात लवकर विरघळत नाही,किंवा लवकर नष्ट होत नाही.त्यामुळे पर्यावरणाला याचा मोठा फटाका बसत आहे.या पुढील काळात आपले पर्यावरण सांभाळायचे असेल तर शेतातील काळी माती किंवा शाडू माती पासुन मूर्ती तयार व्हाव्यात हा उद्देश समोर ठेवू येथील उमंग युथ फाऊंडेशनचा पदाधिकाऱ्यांनी शाडू माती पासुन गणेश मूर्ती तयार करण्याची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.

रामेश्वर जामदार यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून रमेश काळे मार्गदर्शक म्हणून रवींद्र जामदार यांची उपस्थिती होती.कार्यशाळेत 50 पेक्षा जास्त नागरिक,युवकांनी सहभाग घेवून गणेश मूर्ती घरीच बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.