गजानन सोनटक्के जळगाव जा – मागील वर्षीच्या खरीप हंगामात पिकांना लागलेला खर्चही निघाला नाही . आनेवारी ५० पैशाच्या आत आहे अशा एकूणच परिस्थिती मुळे यावर्षी अनेक शेतकरी खरिपाची पेरणी करू शकले नाहीत..

विमा भरपाईची मागणी करून शेतकरी थकले अनेकदा निवेदन देऊन मोर्चे काढले पण शासन प्रशासन यावर चकार शब्द बोलण्यास तयार नाहीत. आणि लोकप्रतिनिधींनी कंपनी कडून चांगभल करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याच महापाप यांनी केले आहे.
म्हणून स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे व विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी १५ जुलै रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात तळ ठोकून शेतकऱ्यांची सर्व आपबिती कथन केली.
आयुक्त यांनी सकारात्मक भूमिका दर्शवून विमाभरपाई संदर्भात विमा कंपन्या व राज्य सरकार यांच्याशी चर्चा करण्याचे ठोस आश्वासन यावेळी बोलतांना दिले ..
जर येत्या ८ दिवसात मागणी ची दखल न घेतल्यास २६ जुलै २०२१ पासून पुणे येथे आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला होतो त्यादृष्टीने स्वाभिमानाचे प्रशांत डिक्कर व शेकडो शेतकरी यांनी कृषी आयुक्तालय पुणे येथे आंदोलन सुरू केले आहे