Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे पोलिसांनी केले आवाहन.

रवींद्र सुरुशे – चिखली मुंगसरी फाटा येथून डोक्याला मार लागलेला एक ६५ वर्षीय वृद्ध बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेने भरती केला . वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले . त्याच्याजवळ कुणीच नातेवाइक नाहीत . त्यामुळे मृतदेहाची ओळख पटणे अवघड झाले आहे . या व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास ९८९०९४५९८३ किंवा ९६२३२४३७३३ या क्रमांकांवर संपर्क करावा , असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोहेकाँ प्रशांत शास्त्री यांनी केले आहे . अज्ञात व्यक्तीचे वर्णन सडपातळ बांधा रंग सावळा, अंगामध्ये पांढऱ्या रंगाचे शर्ट व पांढ-या रंगाचा पैजामा उंची अंदाजे पाच फूट.

Leave A Reply

Your email address will not be published.