पोलीस कर्मचाऱ्याचे वैद्यकीय देयके मिळण्यासाठी अखिल भारतीय पोलिस हक्क संरक्षण संघटनेचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना निवेदन
सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 26 – बुलढाणा जिल्ह्यातील 167 पोलीस कर्मचाऱ्यांची जवळपास तीन ते चार वर्षापासून वैद्यकीय देयके प्रलंबित आहेत वैद्यकीय देयके सादर केल्यानंतर त्यात वेळोवेळी त्रुटी काढण्यात येतात यामुळे कर्मचाऱ्यांच मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे ज्या कर्मचाऱ्यांनी कर्ज काढून वैद्यकीय खर्च केलेला आहे त्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास होत आहे पोलीस कर्मचाऱ्यांच वैद्यकीय देयके तात्काळ देण्यात यावी यासाठी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्यावतीने राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांना तारीख 25 जुलै रोजी निवेदन देण्यात आले या मागणीला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी पाठिंबा दिला
निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारी व संकट काळात पोलीस कर्मचाऱ्यांना 24 तास सेवा द्यावी लागते मात्र याचा विसर वरिष्ठांना पडला आहे वैद्यकीय देयके सी एस यांनी प्रमाणित करून दिलेली असताना सुद्धा त्या बद्दल त्रुटी काढण्यात येते तसेच सदर त्रुटी एकदा सांगण्यात येत नाही एक त्रुटी काढतात देयक परत पाठवतात त्रुटीची पूर्तता केली की देयक सादर केले की त्यात परत त्रुटी काढण्यात येतात अशाप्रकारे पोलीस कर्मचाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे पोलीस महानिरीक्षक अमरावती यांच्याकडून तात्काळ वैद्यकीय देयके देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे
राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांना निवेदन देतांना अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन झोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र अंभोरे समता परिषद तालुका अध्यक्ष एडवोकेट संदीप मेहेत्रे युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश शेट खुरपे सामाजिक कार्यकर्ते सुनिल पवार संजय मेहेत्रे गजानन मेहेत्रे वाजेद पठाण यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते