Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

ईरटीका व मोटर सायकलची अंत्री फाट्याजवळ धडक एक जण गंभीर

Ravindra surushe

रवींद्र सुरुशे

आज दिनांक 16 डिसेंबर ला सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान चार चाकी ईरटीका व दुचाकीची अंत्री फाट्याजवळ बी एस के मार्केट च्या चौफुलीवर जबरदस्त धडक झाल्याने दुचाकी क्रमांक एम एच 28 पी 89 59 या क्रमांकाच्या गाडीवरील दुचाकीस्वार मुरलीधर इंगोले वय वर्ष 55 मु.पोस्ट देऊळगाव माळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांना डोक्याला जबरदस्त मार लागल्या ने ते गंभीर जखमी झाले असून मेहकर येथील खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांना औरंगाबाद येथे पाठविले आहे. अपघात इतका जबरदस्त होता की मोटर सायकल व ईरटीका कार ही रोड वरून वीस ते पंचवीस फूट रस्त्याच्या कडेला खाली गेली. व ईरटीका कारमधील उघडल्या गेल्या.प्राथमिक माहितीनुसार कारमधील व्यक्तीं सुद्धा किरकोळ जखमी झाले आहे. वृत्त लिहीपर्यंत कुठले प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.