शिंदी येथील विशाल हांगे आत्महत्या प्रकरणातील कर्मचारी निलंबित रासपचे जिल्हाध्यक्ष अमोल काकड यांच्या प्रयत्नांने मिळाला न्याय
लोणार,विष्णु आखरे पाटील – लोणार तालुक्यातील शिंदी येथील विशाल हंगे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत होता त्याने वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून 29 मे रोजी आत्महत्या केली होती सदर आत्महत्या प्रकरणांमध्ये दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल काकड यांनी माजी मंत्री पंकजाताई मुंडे व आमदार निलेश राणे यांच्या यांची भेट घेऊन सदर प्रकरणाबाबत गांभीर्याने विचार करण्याची विनंती केली या प्रकरणाबाबत प्रशासनाच्या वतीने गांभीर्याने विचार करून दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल काकड यांनी 18 जून रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.