Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

साधू,संत येती घरा..तोची दिवाळी दसरा…या अभंगाच्या गजरात गजानन महाराज यांच्या पालकीचे आगमन

Sachin mante
Sachin mante
Sachin mante

साधू,संत येती घरा..तोची दिवाळी दसरा…या अभंगाच्या गजरात गजानन महाराज यांच्या पालकीचे आगमन

(प्रतिनिधी सचिन मांटे)किनगाव राजा: कोरोनाच्या सलग काळानंतर आज संत गजानन महाराजांची पालखी”गण गण गणात बोते “गजरेत ७०० वारकरीसह, अश्व, टाळ गजराच्या आवाजात आज किनगाव राजा येथे दाखल झाली. गावातील भावी भक्तानीं मोठ्या हर्ष उत्साहाने श्रीच्या पालखीचे भव्य स्वागत केले आज सलग दोन वर्षानंतर श्रीच्या पालखी किनगाव राजा येथे दाखल. किनगाव राज येथे जणू जत्रेचे स्वरूप झाल्यासारखे दिसून आले मोठ्या संख्येने बाहेर गावाहून आलेले व गावांतील भाविकांची मोठ्यप्रमाणावर वर्दळ दिसुन आली. मोठ्या संख्येने आज श्रीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.पालखी गावात दाखल होताच रस्त्यात साकारण्यात आलेली रांगोळी फुलांचा वर्षाव व पालखीच्या दोन्हीं बाजूला भक्तांची दर्शना साठी गर्दी श्रीच्या दर्शनासाठी पोलीस स्टेशन परिसरात पालखी ठेवण्यात आली. ठाणेदार श्री. युवराज रबडे यांच्या सहपरिवार पहिली आरती करण्यात आली. व त्या नंतर मोठ्या संख्येने भाविकांनी शिस्तीने रागेत लागून श्रीचे दर्शन घेतले.दर्शन घेतल्यानंतर गावातील व बाहेर गावातील येणारे भाविक भक्तांनी व दिंडीतील वारकऱ्यासह महाप्रसादाचा मोठ्यप्रमाणात लाभ घेतला. सलग ५२ वर्षा पासून श्री च्या पालखीचे किनगाव राजा येथे मोठ्या हर्ष उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. मोठ्या संख्येत नेहमीप्रमाणे भाविकांची दर्शनासाठी वर्दळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास श्रीच्या पालखीचे किनगाव राजा येथून दुसरबीड कडे पोलीसच्या कडे कोट बंदोबस्तात रवाना झाली.चंपाकली हत्तीनीच्या निधनानंतर अता श्री च्या पालखी सोबात तिन अश्व आहे. त्यातील दोन हरी, स्वामी, योगीराज असे अश्वचि नाव आहे.२० वर्षापासून हे अश्व श्रीच्या पालखी सोबत आहे.एक सुंदर सा देखावा श्री च्या पालखी सोबत पाहायला मिळाला
किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार युवराज रबडे यांच्या अध्यक्ष खाली श्री च्या पालखीचे सुरक्षा ची जबाबदारी उत्तम पद्धतीने सुरक्षेचे कडे कोट पालन करून श्रीच्या पालखीला पोलीस स्टेशन येथे भाविक भक्तांना दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली.
किनगाव राजा हद्दीत श्रीची पालखी येतातच गावातील नागरिकांकडून दिंडीतील वारकऱ्यांसाठी फराळाचे उत्तम नियोजन केलं चहा, पाणी बॉटल बिस्किट,फराळचिवडा,केळी अशा प्रकारे पायी चालत असताना दिंडीतील वारकऱ्यांना वाटप करण्यात आले.
सात ते आठ हजार भाविक भक्तांनी व दिंडीतील वारकऱ्यांनी घेतला महाप्रसादाचा आनंद गावातील श्री बाळू केवट, श्री नवीन कोठेजा, श्री ज्ञानेश्वर केवट,श्री विनोद हरकळ,श्री भरत हरकळ,श्री प्रकाश शिंदे, श्री संतोष शिंदे या सात जणांनी महाप्रसादाचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात आले.पालखीचे ५३ वे वर्ष
संत गजानन महाराज पालखीचे ५२ वर्षापासून पंढरीची वारी सुरू आहे. यंदा ५३ वर्ष संत गजानन महाराज पालखीची ६१ दिवस पायी प्रवास करून ७०० वारकऱ्यासह निघाली होती. शेगाव पासून पंढरपूर पर्यंत पालखीचा प्रवास ७५० किलोमीटर इतका आहे. परतीला पंढरपूर पासून शेगाव पर्यंत ५५० किलोमीटर आहे. असं एकूण श्रीची पालखीचा १४०० किलोमीटर चा पाई प्रवास आहे.
वारकरी समुदायाकडून स्वच्छतेचे दर्शन संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्या स्वच्छतेची परंपरा जोपासत वारकरी मंडळी पालखी सोबत सेवधारी सेवक झाडू, खराटे घेउन स्वच्छता करताना दिसले.

Leave A Reply

Your email address will not be published.