Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सोनोशी मंडळातील खैरखेड येथे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह जमिन खरडली

Sachin manthe

सिंदखेडराजा तालुक्यात ५३० मी मी पाऊस

सोनोशी मंडळातील खैरखेड येथे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह जमिन खरडली

सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे) – तालुक्यात काल दि ७ आगस्ट दुपार पासून पावसाची संततधार सुरूच असल्याने तालू‌‌‌‌क्यातील साखरखेर्डा मंडळात ५५६:०२ मी मी , शेंदुर्जन मंडळात ६९७:०३ ,. सोनोशी मंडळात ४५८ :०४ , दुसरबीड मंडळात ३९६:०५ , मलकापूर पांग्रा मंडळात ४२८:०६ , किनगावराजा मंडळात ४८८:०७ , सिंदखेडराजा मंडळात ५१७:०८ पाऊस झाला असल्याची आज दि ८ आगस्ट रोजी नोंद आहे .
यामुळे सोनोशी मंडळातील खैरखेड,सोयंदेव या गावावर अतिवृष्टी सारखा पाऊस पडल्याने येथील नदी ,नाल्यांना पुर आला होता. त्यामुळे ते पाणी शेतकर्यांच्या शेतात घसल्याने सोयाबीन कपाशी पिकांसह जमिनही खरडून गेल्या आहेत . तसेच याच मंडळातील सोनोशी , वर्दडी , जांभोरा , चांगेफळ , बुट्टा तांडा , रुम्हणा , भोसा या भागात ५९ मी मी पाऊस पडल्याने नदी , नाल्यांना पुर येऊन पुराचे पाणी शेतात घुसले होते . शेकडो एकर शेतात पाणी घुसल्याने या गातीलही शेतजमीन खरडून गेल्या आहे .

या मंडळात जुन आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे . परंतू गेल्या दोन हाप्त्यात या तिनदा ढगफुटी होवून जोरदार पाऊस झाला असल्याने यात . त्यामुळे खैरखेड भागातील शेतीचा सर्वे करून तेथील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी सरपंच जयश्री दिपक कायंदे सह ग्रामस्थ करीत आहे.तालुक्यातील सिंदखेड राजा किनगांवराजा दुसरबीड मलकापूर पांग्रा शेंदूर्जेन व साखरखेर्डा या सहा मंडळातही दोन दिवसापासुन संतधार पाऊस पडत असल्याने या मंडळातील गावातील शेती पिकाचे मोठे नुकसान होवून पिक पिवळी पडली तर शेतीचे कामेही खोळंबली आहेत त्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले असल्याचे दिसत आहे

विदर्भ- मराठवाडा सीमेवर बुट्टातांडा या भागात विदृपा धरण आहे . हे धरण १०० टक्के भरले असून दोन्ही बाजूंच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा सुरु आहे . या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या चांगेफळ ,भोसा वझर सरकटे ही गावे आहेत.चांगेफळ गावातूनच नदी वाहात असल्याने गावाला नेहमीच सतर्क राहावे लागते . सरपंच जनार्धन मोगल यांनी विशेष दक्षता म्हणून पुर आल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी ग्राम पंचायत पथक तयार केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.