Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

दुचाकी समोर कुत्रा आडवी आल्यामुळे अपघात: मेहकर चे आरएफओ सुरेश काळूसे यांचे निधन

सिंदखेडराजा(प्रतिनिधी सचिन मांटे)
दुचाकी समोर कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात झाल्यानंतर मेहकर चे आरएफओ सुरेश कारभारी काळूसे यांचे आज ९ जून रोजी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.बुलढाणा येथे पाळणाघर येथे राहणारे काळूसे हे बुलढाणा वनविभागात कार्यरत होते व मेहकर आरएफओ या पदावर कार्यरत होते.

SACHIN MANTE

धाड नाक्यावर कडून आपल्या घरी जातं असताना दुचाकी समोर कुत्रा आडवी आल्यामुळं त्यांचा अपघात झाला व ते बेशुद्ध झाले हि गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे नेण्यात आले व प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारसाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते पण आज सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योती मावळली, हि बातमी कळताच त्यांच्या मित्रामध्ये व वनविभाग बुलढाणा मध्ये शोककळा पसरली त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,व चार भावंडाचा परिवार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.