Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शिवराज्याभिषेक दिनाचा नगरपरिषद ला पडला विसर

NAGAR PARISHAD

गजानन सोनटक्के जळगाव जा– दिनांक 6 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यभरच नव्हे तर देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन संपन्न झाला.हा सोहळा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपन्न होत असतांना सुद्धा नगर परिषद जळगाव जामोद शासन व प्रशासनाला शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा पडला विसर पडला.
छत्रपतींच्या नावावर मते मागून देशात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपशासित नगरपरिषद प्रशासनास शिवराज्याभिषेक दिनाच्या विसर पडणे म्हणजे एक प्रकारे शिवभक्तांच्या भावनांसोबत केलेली थट्टाच होय. अशा या निगरगट्ट व छत्रपतींचे नावाचा केवळ वापर करणाऱ्या व छत्रपतींचा सन्मान करण्याची मानसिकता नसलेल्या विचारसरणीचा नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी जाहीर निषेध व्यक्त केला .
नगर परिषद च्या संबंधित अधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा का आयोजित केला नाही अशी विचारणा केली असता त्यांनी अत्यंत पोरकट व उडवाउडवीची उत्तर देत थातूर मातुर समाधान करण्याचा प्रयत्न केला.अशा या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वेळीच कार्यवाही होणे आवश्यक आहे.अन्यथा अशा या घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या नगराध्यक्षा व संबंधित पदाधिकारी यांना जनता माफ करणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.