बुलडाणा दि.10 : सैनिक मुलांचे वसतिगृह, बुलडाणा येथील वसतिगृहासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानधनावर एक वर्षासाठी रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी वयोमर्यादा 50 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असणार आहे. या पदांमध्ये सहाय्यक वसतिगृह अधिक्षक एक पद असून यासाठी हवालदार व त्यावरील माजी सैनिक आवश्यक आहे. स्वयंपाकीनचे तीन पदे आहेत. यासाठी माजी सैनिकांच्या पत्नीला प्राधान्य देण्यात येणार आहे. सफाईवाला हे एक पद आहे. त्याकरीता माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन पाहीजे. चौकीदाराचे एक पद असून त्यासाठी माजी सैनिक अथवा सिव्हीलीयन हवा आहे. तरी इच्छूकांनी 16 जुन 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
Related Posts