Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

पाणी टंचाई निवारणार्थ 53 विंधन विहीरी ; 23 कुपनलिका मंजूर 65 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाययोजना

बुलडाणा, दि‍.10 : पाणीटंचाई निवारणार्थ सिं.राजा तालुक्यातील 25, चिखली तालुक्यातील 7, संग्रामपूरमधील 5, जळगांव जामोदमधील 5 व खामगांव तालुक्यातील 5 गावासाठी 53 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच  संग्रामपूर तालुक्यातील 7, जळगांव जामोद तालुक्यातील 5, शेगांव तालुक्यातील 6 कुपनलिकांची कामेही मंजूर आहेत. एकूण 65 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

water

   विंधन विहीरी सिंदखेड राजा तालुक्यातील सायाळा, आडगांव राजा, केशवशिवणी, किनगांव राजा, कुंबेफळ, मलकापूर पांग्रा, मोहाडी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, नागझरी, देऊळगांव कोळ, धांदरवाडी, धानोरा, दुसरबीड, हिवरखेड पुर्णा, वर्दडी खु, खामगांव, पिंपळगाव सोनारा, नशिराबाद, सोनोशीा, सुलजगाव, तडेगाव, उमनगाव, वडाळी, वाघजई, चिखली तालुक्यातील टाकरखेड हेलगा, शेलगांव जहागीर, मनुबाई, बोरगाव वसु, खैरव, पांढरदेव, किन्होळा,  संग्रामपूर तालुक्यातील गुमठी, चिचारी, वसाडी नविन, वसाडी जुनी, शिवणी,  जळगांव जामोद तालुक्यातील निमखेडी, प्यारसिंग टपरी, चाळीस टपरी, गोमाळ, मेंढामारी, खामगांव तालुक्यातील हिवरा बु, जळका भडंग, पारखेड, ज्ञानगंगापूर या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. तर संग्रामपूर तालुक्यातील भोन जुने, भोन नविन, निवाणा, रूधाणा, एकलारा, आलेवाडी, जळगांव जामोद तालुक्यातील चालठाणा, सुनगांव, गोरखनाथ, ईसाई, शेगांव तालुक्यातील आडसूळ, भास्तन, डोलारखेड, घुई, कठोरा, सगोडा  या गावांसाठी कुपनलिका मंजूर करण्यात आलेल्या आहेत. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.