


Saontake
सुनगाव येथे स्वातंत्र्यदिनी करण्यात आले ध्वजारोहण….
गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे आज दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा ग्रामपंचायत कार्यालय, आयुर्वेदिक दवाखाना, मातोश्री नथियाबाई विद्यालय, अंगणवाडी केंद्रे या ठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले असून हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे शासनाने देशभर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. हे उपक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा मानस आहे. जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये शाळा समिती अध्यक्ष सुनील खवले यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत येथे गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या हस्ते, आयुर्वेदिक दवाखाना येथे पंचायत समिती माजी उपसभापती महादेवराव धुर्डे यांच्या हस्ते, मातोश्री नथिबाई विद्यालयामध्ये मुख्याध्यापक संजय इंगळे यांच्या हस्ते तर सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविकांनी ध्वजारोहण केले. सकाळपासूनच पावसाची रिप रिप चालू असल्यावरही नागरिकांनी ध्वजारोहणाकरिता ठिकठिकाणी मोठी गर्दी केली. सदर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष शाळेचे शिक्षक कर्मचारी वृद, पत्रकार बांधव, यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.