
गजानन सोनटक्के जळगाव जामोद – जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील सुनगाव ते जामोद रोड वर शेतामध्ये आढळला मांडूळ जातीचा साप साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा साप येथील शेतकऱ्याला दिसला त्यामुळे हा साप शेतात असताना रोड वरून जाणाऱ्या नागरिकांनी साप बघण्यासाठी एकच गर्दी केली हा साप अंदाजे तीन ते साडेतीन फुटापर्यंत लांबीचा होता त्यानंतर गावातील नागरिकांनी विभागाशी संपर्क करून फॉरेस्ट विभागाचे घुईकर व खेडकर हे कर्मचारी घटनास्थळावर हजर झाले आणि त्यांनी तो साप ताब्यात घेऊन जळगाव जामोद वनविभाग यांच्याकडे सुपूर्द केला.