(सचिन मांटे)किनगावराजा पासून काही कि.मी अंतरावर असेलेले उमरद येथील ह.भ.प सचिन केकान महाराज हे बालपणा पासून वारकरी संप्रदायाची सेवा करीत आहे.त्यांच्या सुंदर मनमोहक आवाजाने सर्वांचे मन मोहित केले आहे.तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम सुद्धा केले आहे.
तसेच त्यांनी आपले शिक्षण शिकत असतानाही गायनामध्ये खूप वेगळे असे सन्मानपत्र मिळविली आहेत….
त्यांच्यावरील झालेले वारकरी संप्रदायाचे संस्कार हे त्यांच्या कार्यक्रमातून वेळोवेळी दिसून आल्याची प्रचिती देतात….
तसेच ते तरुणांमध्येही एक स्पुर्ती निर्माण करतात.
अशाच विविध कार्याची दखल घेऊन “श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव “यांच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2020/ 21
राधाकृष्ण विश्वरत्न कला कीर्तनकार आदर्श पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करण्यात आला आहे…तसेच उमरद येथील कलावंत प्रभाकर वखरे हे ही विविध कला पुरस्कारानीं सन्मानित करण्यात आले आहे
तसेच त्यांच्या कलेची दखल घेऊन घेऊन “श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव “यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा 2020/ 21
राष्ट्रीय कला भूषण आदर्श कला भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे
