बुलडाणा दि.11 : जुनी प्रशासकीय इमारत व अन्न, औषध प्रशासन विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीसाठी जागेची पाहणी आज 11 जुन रोजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी बस स्थानकासमोरील प्रशासकीय इमारतीच्या आवारात केली. यावेळी त्यांनी जागेचा नकाशा बघीतला व नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासंदर्भात माहिती घेतली. या परीसरात अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन कार्यालय इमारतीची सुद्धा चाचपणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना जागा उपलब्ध करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, सहा आयुक्त श्री. बर्डे आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Related Posts