Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सुनगाव जिल्हा परिषद शाळा येथे जागतिक जल दिन साजरा

गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळा यांच्या मार्फत 22 मार्च जागतिक जलदिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा येथील विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढून गावात पाण्याचे जीवनात असलेले महत्त्व सांगण्यात आले या प्रभात फेरीत मुलांच्या व शिक्षकांच्या पाण्याच्या महत्त्व असलेल्या घोषणांनी गाव दुमदुमून गेले होते व मुलांच्या हाती असलेले पोस्टर्स पाणी आडवा पाणी जिरवा पाणी वाचवा हे प्रभात फेरीचे मुख्य आकर्षण ठरले होते त्यानंतर जिल्हा परिषद शाळा येथे जल दिना निमित्त जल प्रार्थना विद्यार्थी व शिक्षकांनी घेतली व येथील साबे मॅडम यांनी जागतिक जल दिनाचे व जीवनात पाण्याचे असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले यावेळी जिल्हा परिषद शाळा समिती सौ सोनटक्के व जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते

Sonttake
Leave A Reply

Your email address will not be published.