Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भावाची शक्यता; उपाययोजना कराव्यात – कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 9 : राज्यात सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. या वर्षी सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाचेवतीने करण्यात आले आहे.

SOYABEEN

   खोडमाशीची प्रौढ अवस्था म्हणजेच माशी अवस्था चमकदार काळ्या रंगाची व आकाराने लहान म्हणजेच 2 मी.मी. असते. या किडीची अंड्यातून निघालेली बिन पायाची अळी फिकट पिवळसर रंगांची असून हि अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या प्रथम सोयाबीनची पाने पोखरतात आणि पानांच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून या फांदीचा किंवा खोडाच्या आतील भाग पोखरून खातात. अशा प्रकारचे प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास आतमध्ये पांढूरकया रंगाची अळी किंवा कोष आढळतो. या किडीचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या रोपावस्थेत झाल्यास म्हणजे सोयाबीनची पेरणीनंतर 10 ते 15 दिवसाचे पिक असताना झाल्यास, प्रादुर्भाव ग्रस्त झालेले झाड वाळते व झाडाच्या ताटाच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन कधी कधी तीव्र प्रादुर्भाव झाल्यास दुबार पेरणी करण्याची सुद्धा काम करू शकते व अशाप्रकारे रोपावस्थेत या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

   सोयाबीनचे पीक मोठे झाल्यावर या किडीच्या प्रादुर्भावामुळे असा परिणाम दिसत नाही. खोडमाशी ने कीडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याच्या वजनात घट होऊन उत्पादनात 16 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत घट येऊ शकते. या पार्श्वभुमीवर सोयाबीनवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधुंनी पुढील उपाय योजना कराव्यात .

उपययोजना : जेथे या किडीचा प्रादुर्भाव नियमितपणे आढळतो, अशा ठिकाणी पेरणीचे वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार 10

किलो प्रति हेक्‍टर जमिनीत ओल असताना टाकावे. कीडग्रस्त पाने फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. सोयाबीन पिकात खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यासाठी सोयाबीन पीक उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी प्रति हेक्‍टर 25 पिवळे चिकट सापळे लावावेत. खोडमाशीसाठी उष्ण तापमान, जास्त आर्द्रता, भरपूर पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण अशा बाबी वाढीसाठी पोषक ठरतात म्हणून अशा वातावरणात पेरणीनंतर वेळोवेळी या संदर्भात जागरूक राहून वेळोवेळी निरीक्षण घ्यावीत. पेरणीपूर्वी सोयाबीन पिकात काही कारणास्तव थाय मेथोक्झामची बीजप्रक्रिया केली नसल्यास सोयाबीनचे पिक 15 दिवसाचे झाल्यानंतर इथियॉन 50% – 30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 % – 6.7 मिली किंवा chlorantraniliprole 18.5 % -3.0 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.