जालना – गेली सतरा वर्षे जालना शहरात हृदयरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करून आपले स्वतंत्र नाव तयार करणारे व निमगाव वायाळ,ता सिंदखेड राजा येथील जन्मगाव असलेले जालना हॉस्पिटल अंबड चौफुली जालनाचे सुप्रसिद्ध डॉ.प्रदीपजी हुशे यांचा दिनांक 6 जुलै रोजी वाढदिवस होता..
त्या निमित्ताने डॉ.हुशे यांच्यावर प्रेम करणारे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर्स,राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी, सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक,वर्षानुवर्षे त्यांच्यावर विश्वास ठेवणार पेशंट व त्यांचे नातेवाईक आणि विविध क्षेत्रातील जनसमान्यांनी उस्फूर्तपणे साहेबांचा वाढदिवस साजरा केला..
साहेबांवर प्रेम करणाऱ्या सामान्य लोकांनीच अनेक ठिकाणी स्वखर्चाने उपक्रम रावलेत.जालना जिल्ह्यातील अनेक खेड्यांमध्ये, जालना शहरात व काही शाळांमध्ये साहेबांच्या स्व खर्चाने वृक्षरोपन कण्यात आले,
तसेच बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा,देऊळगाव राजा,लोणार या तालुक्यांमध्येही शेकडो झाडांचे वृक्षारोपण करून साहेबांचा वाढदिवस साजरा केला..
डॉ.हुशे साहेबांनी दुसदबीड येथील मंदिरास RCC बेंच देऊन सामाजिक उत्तरदायित्व जोपासले.
विविध उपक्रमांनी डॉ.साहेबांचा वाढदिवस आप्तेष्ट,मित्र व चाहत्यांनी साजरा करून समाजाला सामाजिक जाणिवेचा व वृक्ष संवर्धनाचा मोलाचा संदेश दिला..