सिंदखेड राजा – अपुरे संख्याबळ व भारतीय जनता पार्टीची एकमेव सदस्य असलेल्या सौ नंदाताई विष्णू मेहेत्रे यांनी विश्वास ठरावाला सामोरे न जाता उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता . राज्यात सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि महा विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली महा विकास आघाडीची सत्ता स्थापन झाली तेव्हापासून नगरपालिकेत देखील आघाडी व्हावी यासाठी चर्चा सुरू होती दोन वर्षानंतर महा विकास आघाडी करण्याचा निर्णय अंतिम झाला आणि दोन महिन्यापूर्वी भाजपच्या उपाध्यक्ष पदाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला सर्व नगरसेवक एकत्र आल्याने उपाध्यक्षांनी पुरेसे संख्याबळ नसल्याने व सभागृहात भाजपचा एकमेव नगर सेवक असल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला दरम्यान उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीला कोरोना प्रतिबंधाचा अडसर आल्याने ही निवड पुढे ढकलण्यात आली होती .

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवार 10 ऑगस्ट रोजी उपाध्यक्ष ची निवडणूक होऊ घातली असून नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या निवडणुकीत राष्ट्रवादी आपल्या आठ पैकी कोणत्या सदस्याचे नाव पुढे करणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती रविवारी या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी इच्छुक सदस्यांच्या मुलाखती घेतल्या त्यात ते कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज नगरपरिषद उपाध्यक्ष पदाकरितासौ रुक्मिणीबाई राधाजी तायडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड हि बिनविरोध करण्यात आली . व नगराध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पदी तायडे असणे हा संयोगही नगरपरिषद अस्तित्वात आल्यापासून प्रथमच जुळून आला .