Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शेतकर्यासह तलावात छेडणार स्वाभिमानी आंदोलन….

चिखली–सतत तिन तास कोसळलेल्या पावसामुळे देखभाल दुरुस्ती नसलेले आमखेड,अंबाशी येथील तलाव फुटल्याने शेतकर्याच्या जमिनी पिकासह खरडुन गेल्या आहेत.असे असतांना प्रशासन गंभीर नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले असुन जमिन सुपीक बनवणेसाठी शेतामधे गाळ टाकण्यासाठी उपाययोजना करण्यासह परीसरातील नुकसान ग्रस्त शेतकर्याना १००%नुकसान भरपाई देण्यात यावी,सदरील प्रकार घडण्यास जबाबदार असलेल्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणीजिल्हाधिकारी,तहसिलदार यांच्याकडे दि05जुलै रोजी करण्यात आली असुन आंदोलनाचा इशारा शेतकर्यासह स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांनी दिला आहे.

swabhimani


मागील आठवड्यात ढगफुटी सारख्या कोसळलेल्या पावसामुळे आमखेड,अंबाशी येथील तलाव फुटून शेकडो हेक्टर जमीन पिकासह खरडुन गेली आहे.शेत होत्याचे नव्हते झाले तर दगडांचा खच त्या सुपीक असलेल्या जमीनीमधे दिसत आहे.तर या जमिनी स्व खर्चा ने सुधारणे शक्य नसुन सद्याचे सोयाबीन पिक हातुन गेलेच तर अंबाशी तलावातील पाणी नाईलाजस्तव सांडव्यातुन सोडावे लागणार असल्याने तलावामधे पाणी नसेल तर दुसरे पिक घ्यायचे कसे असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थीत करीत आहे व जमीनीमधे दगडच दिसत असल्याने दुसरे पिक घेता येईल याची शाश्वती सुद्धा नाही.आमखेड येथील तलावाची दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थांकडुन यापुर्वी वारंवार करण्यात आली होती.मात्र याची कसलीही दखल न घेतल्या गेल्यानेच शेतकर्यावर उपासमारीची वेळ आली असुन जमिन असुनही भुमिहिन झाल्याची परीस्थीती या भागातील शेतकरी यांच्यावर ओढावली आहे.तर या शेतकर्यावर मोठे संकट कोसळलेले आहे.अशी भीषण परीस्थीती असतांना मात्र अधिकारी अंबाशी येथील तलाव सुरक्षीत असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगतात जमिन वाहुन गेली असतांना अशे बोलुन शेतकर्याच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सिंचन विभागाकडुन होत आहे.

तर संकटात सापडलेल्या शेतकरी यांना मदतीचा हात देण्याचे सोडुन उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याने प्रशासन यावर गंभीर नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असुन खरडुन गेलेली जमीन सुपीक बनवण्यासाठी गाळ टाकण्यासाठी प्रशासनाने ट्रक्टर,जेसीबी,टिप्पर उपलब्ध करुण देत मजुरी व वाहतुक खर्च देऊन उपाययोजना करण्यात याव्या,परीसरातील जमीनी खरडुन गेलेल्या शेतकर्याना १००%नुकसान भरपाई देण्यात यावी,तलावांची दुरुस्ती व देखभाल करण्यास असमर्थ ठरलेल्या जबाबदार व संबंधीत दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,या विभागालाच यासाठी जबाबदार धरुण नुकसानग्रस्तांना मदत देण्यात यावी, देखभाल,दुरुस्तीचे यापुर्वी बिले काढली किवा कसे याची सुद्धा चौकशी करावी अशी मागणी चिखली तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.सदर मागण्यांची पुर्तता सात दिवसात न झाल्यास शेतकर्यासह अंबाशी,आमखेड येथील खरडुन गेलेल्या शेतामधे बेमुदत उपोषण करण्याचा येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी स्वाभिभानी विनायक सरनाईक,नितिन राजपुत,राम आंभोरे,भागवत म्हस्के,विनोद देशमुख,सुभाष देशमुख,गजानन देशमुख,तुळशीदास गायकवाड,प्रल्हाद देशमुख,विजय गायकवाड,गजानन वाघ,वैभव वाघ,सहदेव वाघ,उमेश वाघ,यांच्यासह अंबाशी आमखेड येथील शेतकरी उपस्थीत होते.


एकलारा,पाटोदा,तेल्हारा शिवारातील शेतकर्याना नुकसान भरपाई द्यावी

अंबाशी,आमखेड याच शिवारालाच लागुण असलेल्या एकलारा,तेल्हारा,पाटोदा यासह परीसरात नदिकाठची शेती खरडुन गेले असुन मोठे नुकसान झाले असल्याने या शेतकर्याना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील स्वाभिमानीने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.