जळगाव जा गजानन सोनटक्के – चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सीआयएसएफ जवानाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर रोडवरील ऊर्जानगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली कैलास नारायण कापरे असे मृत जवानाचे नाव आहे कैलास कापरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव चे रहिवासी आहेत मागील काही वर्षापासून ते औष्णिक विद्युत केंद्रात सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत होते मंगळवारी सायंकाळी ते आपल्या दुचाकीने लखमापूर कडे जात होते दरम्यान त्यांच्या मागून भरधाव येणाऱ्या टिप्पर क्रमांक एम एच 34 एम 41 62 ने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली .
यामध्ये ते गंभीर जखमी झाले परिसरातील नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला या बातमीने सुनगाव परिसरात शोककळा पसरली त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर हे सुनगाव येथे काल रात्री नऊच्या सुमारास आणण्यात आले त्या वेळी लोकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती व त्यानंतर स्वर्ग रथ हार फुलांनी सजवून या जवानाची वाजत गाजत मिरवणूक यावेळी गावातील रस्त्यांवर स्त्रियांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या होत्या यावेळी सुनगाव हे अश्रुंच्या पुरात न्हाऊन निघाल्यासारखे झाले व सुनगाव गावावर मोठी शोककळा पसरली आहे गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली व सुनगाव ते जळगाव रोडवरील त्यांच्या स्वतःच्या मळ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडला .
यावेळी बुलढाणा येथील जवानांनी आपल्या तालासुरात जवानाला अखेरची सलामी दिली व हवेत फैरी झाडल्या यावेळी जळगाव जामोद महसूल मंडळ कर्मचारी आमदार डॉ संजय कुटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रसेंनजित पाटील, शिवसेनेचे दत्ताभाऊ पाटील, कॉग्रेसचे अविनाश उमरकर, जिल्हापरिषद सदस्य रूपालिताई काळपांडे पंचायत समिती सभापती रामेश्वर राउत, उपसभापती महादेवराव धुर्डे, माजी पंचायत समिती सदस्य गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार, गरमपंचायत सदस्य माजी सरपंच पुंडलिक पाटील याच्यासह तालुक्यातील हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे