सुनगाव येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत पोखरा समिती व तंटामुक्त अध्यक्षाची ग्रामसभे मध्ये निवड
गजानन सोनटक्के जळगाव जा -नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या ग्राम सुनगाव येथील पूर्वीची समिती बरखास्त करण्यात आल्यामुळे नवीन ग्राम कृषी संजीवनी समिती पोखरा स्थापन करण्याकरिता दिनांक आठ सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्यात आली त्यामध्ये सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या संमती व स्वाक्षरीने रीतसर नोटीस काढून सदर ग्रामसभा घेण्यात आली.
सदर समिती स्थापन करण्यासाठी सुनगाव येथीलच आवजीसिद्ध महाराज मंदिरातील मंगल कार्यालय मध्ये घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये नवीन ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्यात आली.सदर समिती मध्ये एकूण तेरा सदस्य निवडण्यात आले असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत या समितीमध्ये सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे समिती अध्यक्ष सरपंच रामेश्वर अंबडकार,उपसरपंच हे या समितीचे पदसिद्ध सदस्य आहेत त्यामुळे उपसरपंच संगीराबाई तडवी, तसेच ग्रामपंचायत सदस्य एक पुरुष एक महिला यामध्ये सौ कौशल्या दिनेश ढगे, बळीराम धुळे, तसेच या समितीमध्ये सर्वसाधारण महिला अनुसूचित जाती,जमाती, विमुक्त भटक्या जाती यामधील तीन सदस्य म्हणून सुनीता ताडे,लता गवई,रमाबाई वसतकार
तसेच समितीमध्ये प्रगतशील शेतकरी दोन सदस्य अमोल एडाखे,अनिल सोळंकी तसेच समिती मध्ये शेतकरी उत्पादक गट कंपनी प्रतिनिधी म्हणून एक सदस्य त्यामध्ये अर्जुन ढगे,महिला बचत गट प्रतिनिधी सौ मीरा शेषराव वंडाळे, कृषिपूरक व्यवसायिक शेतकरी दोन सदस्य त्यामध्ये गोपाल मधुकर धुळे व राजेश जीवनलाल झंवर यांची निवड कृषी संजीवनी समिती साठी करून सदर समिती गठीत करण्यात आली आहे. यावेळी ग्रामसभेमध्ये सरपंच रामेश्वर अंबडकार, उपसरपंच सगिराबाई तडवी, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, ग्रामविकास अधिकारी टि.जी.चौधरी,तलाठी वाघ,तलाठी केदार,कोतवाल तुकाराम ढोले, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे, बळीराम धुळे,देवा वानखडे,गजानन दातीर,उमेश कुरवाडे,राम राजपूत,दिनेश ढगे,कृषी सहाय्यक ढाकुरकर मँडम,समूह सहाय्यक पवन नवथळे,कृषी मित्र मोहनसिंह राजपूत,पोलीस कर्मचारी आशिष भारती,
पत्रकार गजानन खिरोडकार, गणेश भड,गजानन सोनटक्के,यांच्यासह शेकडो सुनगाव येथील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.तसेच यावेळी सुनगाव येथील ग्रामस्थांना तलाठी वाघ यांनी ई पीक पाहणी कशी करावी व ॲप मध्ये माहिती कशा पद्धतीने भरण्यात यावी याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी ग्रामस्थांना असे आवाहन केले की अजून पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी ॲप मध्ये आपल्या पिकाची माहिती भरली नसेल त्यांनी लवकरात लवकर ई पीक पाहणी ॲप मध्ये आपल्या पिकाची माहिती त्वरित भरावी असे आवाहन केले.