Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अपघात होवून एका शेतकऱ्यांच्या उपचार दरम्यान मृत्यू तर दुसऱ्या शेतकऱ्यांवर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू .

सिंदखेड राजा – सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथील रुस्तुम गोवींद म्हस्के वय ५० वर्षे व प्रल्हाद रामकीसन जायभाये हे दोघेजण शेतामध्ये फेरणी दिवस असल्यामुळे सोयाबीन चे बियाणे आणण्यासाठी मोटार सायकल एम.एच २८ डी.बी.२४२९ महारखेड वरून किनगांव राजा जात पळसखेड चक्का सकाळी ११.३०च्या सुमारास अपघात होवून एका शेतकऱ्यांच्या उपचार दरम्यान एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या शेतकऱ्यांवर जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

two wheeler


सविस्तर वृत्त असे की सद्या पेरणीचे दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांची फेरणी साठी लगबग सुरू आहे.त्यामध्येच सोयाबीन बियाणे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांसाठी फिरावे लागते आहे. त्यांसाठी महारखेड येथील दोन शेतकरी सोयाबीन चे बियाणे आणण्यासाठी किनगांव राजा तेथे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव वेगाने टीयागो वाहनाने उडविले.महारखेड येथील शेषराव देवरे यांनी कुटूंबाला अपघाताची माहिती दिली.टीयागो कार एम एच २८ ए. झेड ३२७४ वाहन किनगांव राजा वरून सिंदखेड राजा च्या दिशेने जात असताना शेतकऱ्यांना दुचाकी वाहनाला धकड दिली. त्यानंतर महारखेड येथील ग्रामस्थांनी जखमी शेतकऱ्यांना उपचार साठी ग्रामीण रुग्णालयात दाखक करण्यात आले होते, शेतकऱ्यांना मार जास्त प्रमाणात असल्यामुळे प्राथमिक उपचार करून जालना येथे पुढील उपचारासाठी पाठविण्या आले. जालना येथील संतकृपा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुस्तुम गोवींद म्हस्के यांना डोक्याला व पायाला मार जास्त लागल्या असल्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. व प्रल्हाद रामकीसन जायभाये वय ४० वर्षे यांच्यावर संतकृपा हॉस्पिटलमध्ये येथे उपचार सुरु आहे. मृतक रुस्तुम गोवींद म्हस्के यांना पोस्टमॉर्टम साठी सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मृतक शेतकऱ्यांचा मुलगा गजानन रुस्तुम म्हस्के वय ३२वर्षे रा.महारखेड यांनी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन मध्ये तोंडी रिपोर्ट दिला आहे त्यावरून पोलीसानी गुन्हा दाखल करून पुढील तपास सिंदखेड राजा पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.