Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

उगले पाटील यांनी वार्धक्यातही फुलवला विविध फळबागांचा मळा UGALE PATIL

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील पांगरी उगले या छोट्याश्या गावातील दत्तात्रय उगले पाटील हे अत्यंत अभ्यासू व प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी म्हणून गावामध्ये ओळखले जातात. गावापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतावर त्यांनी पपई, केळी, आंबा, लिंबोनी, रामफळ, सीताफळ,आवळा व थोडेसे गुरांसाठी या पिकांची लागवड केली आहे.पारंपरिक शेतीत बदल करीत त्यांनी ही फळं झाडांची लागवड केली आहे.

Dattatray ugale patil


त्यामध्ये उगले पाटिल यांनी २०गुंठे जाग्यामध्ये सीताफळ लागवड तर इतर एक एकरमध्ये त्यांनी पपई, आवळा, आंबे, केळी, लिंबोणी, चारापिके इत्यादी पिके त्यांनीं घेतली आहे. व दर्जेदार उत्पादन या वर्षी होइल असेही त्यांनी सांगितले. उगले पाटील यांच्या घडवलेल्या प्रयोगशील शेतीतून कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले. शेतीतील यशाचे समाधान कुटुंबातील सदस्यांच्या व गावाच्या चेहऱ्यावर न दिसले तर नवल ते काय?भाजीपाला उत्पादन
केळी आणि पपई या दोन झाडांच्या फट्टीत वेगवेगळ्या भाजीपाल्यांची उत्पादन ते घेत आहेत. त्यामधे गोबी, पालक,मेथी,कांदा, लसूण व इतर भाज्यांचे उत्पादन ते घेत आहेत.
शेतीत मेहनत आवश्‍यकच आहे. पण त्याच्या जोडीला नवे तंत्रज्ञान, अभ्यास यांची जोड द्यायला हवी, तरच शेती फायदेशीर होईल. अलीकडील काळात शेतमालाचे दर घसरले आहेत. परंतु योग्य नियोजन आणि उत्पादन खर्च कमी करावा लागेल अर्थातच सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करावी लागेल. गायी आणि बैल सोबत घेऊन शेती करावी लागेल ते शेतीचा खर्च कमी करतात असे मला वाटते.
पाटील यांच्या शेतीची वैशिष्ट्ये-

1) कमी जागेत जास्त उत्पादन
2) उत्पादन खर्च कमी
3) ठिबक सिंचनाचा वापर (पाण्याची बचत)
4) सेंद्रीय शेती
5) शेणखत व गोमुत्राचा वापर
6) जवळ पाण्याचा स्रोत नसल्याने लांबच्या विहरीवरून पाइपलाइन
6)पाण्याचे योग्य नियोजन
मार्गदर्शन –
उगले पाटील हे दररोज शेतीसबंधित पुस्तकांचे वाचन करत असतात व त्याच ज्ञानाचा वापर ते शेतिमध्ये करतात. व तसेच दत्तात्रय उगले पाटील यांचा नातू गोपाल नरसिंग उगले, कृषी महाविद्यालय अकोला येथे घेत असतानाच हा युवक उगले पाटील यांना व गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. गोपाल उगले शेती आवड व त्यामधे विशेष सेंद्रिय शेतीची आवड त्याला असल्याने रासायनिक खतांचा व औषधांचा वापर न करता घराच्या घरीच शेती आपण पिकऊ शकतो असं तो सांगत आहे. व दत्तात्रय पाटलांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन मिळत आहे.
समाजसेवेची आवड
उगले पाटील हे वेळोवेळी गावच्या हितासाठी धडपडत असतात ते नेहमी गावातील शेतकरयांना मदत करण्यात अग्रेसर असतात. त्याचबरोबर दत्तात्रय उगले पाटील यांना समाजसेवेची सुद्धा आवड आहे. पाटील यांनी त्यांच्या शेतामध्ये गुरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा हौद तयार केला आहे व त्यामधे संपूर्ण गावातील शेतकर्यांचे गुरे पाणी पिण्यासाठी येतात. तब्बल 20 वर्षांपासून हा पाण्याचा हौद त्यांनी तयार केलेला आहे.

शेतीतील वाटचाल
सन 1966 च्या सुमारास पाटील यांनी शेती करायला सुरवात केली. भागातील मुख्य पारंपरिक पीक म्हणजे करत असताना त्यांनी आता आधुनिक शेती आणि सेंद्रीय शेतीकडे वाटचाल करत आहेत त्याचबरोबर ते इतर शेतकरयांना सोबत घेऊन चालत आहे. शेतकरीही श्रीमंत झाला पाहिजे असं ते वेळोवेळी बोलून दाखवतात व त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहेत.

प्रतिनिधी गोपाल उगले
मो- 9503537577

Leave A Reply

Your email address will not be published.