Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जागतिक नेतृत्व फक्त माध्यमांवर करणारे निवडणुक प्रचारातुन कधी बाहेर येतील ?

युक्रेन – रुस युद्धाच्या बातम्या विचलित करणाऱ्या आहेत . युद्ध म्हटले कि त्यात नुकसान लढ़नाऱ्याचे होतेच त्यासोबत त्याची झळ जगाला सोसावी लागते .युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण स्वस्तात होते म्हणुन भारतीय विद्यार्थ्यांची पसंती युक्रेन मध्ये शिक्षण घेण्यासाठी असते तसेच युक्रेन मध्ये जगातील इतर देशातील विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात मग आज हा प्रश्न उभा राहतो युद्ध प्रत्यक्ष सुरु झाले अमेरिकेने ११ फेब्रुवारीलाच आपल्या विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्यास सांगितले होते तेव्हा आपली केंद्र सरकार कुठे होती ? आपले पंतप्रधान नेहमीच निवडणुक प्रचारात व्यस्त असतात आजपर्यंत आपल्या देशात काय जगभरात सर्वात जास्त प्रचार सभा घेणारे राष्ट्रप्रमुख म्हणुन गिनीस बुक मध्ये जागतिक विक्रम म्हणून नोंद होईल .

ukraine

आमचे सरकार यांच युक्रेन च्या परिस्थितीवर लक्ष नव्हतं कि गांभीर्य नव्हतं ,विमान कंपनी यांनी वाढवलेले प्रवासाचे दर त्यामुळेही अनेक विद्यार्थी येण्यासाठी तत्परता दाखवू शकले नाही आणि आमचे सरकार करणार तरी काय कारण खाजगीकरणाच्या नादात आता आमच्या सरकारकडे स्वतः ची Airline नाही . आमचा देश जगातील चौथ्या क्रमांकाची महासत्ता असुन आम्ही तठस्थ भूमिका घेतली याचाही त्रास तिथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना होतोय आणि इकडे आमची मीडिया मोदी – पुतीन यांना समजावत असल्याच्या आभासी बातम्या पेरत आहे , १५ ते २० हजार विद्यार्थी अडकलेले असताताना ५ – १० विमान आणू शकले त्या मोहिमेला गंगा नाव देऊन त्यातही उत्तर प्रदेश निवडणुक डोळ्यासमोर फक्त स्वतः ची स्तुती आणि महिमामंडल सुरु आहे . आतातरी केंद्र सरकार ने प्रसिद्धी आणि निवडणूक प्रचार यातून बाहेर येऊन त्या अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घरी आणावे आपल्या नागरिकांचे रक्षण करणे हे आद्य कर्तव्यच आहे प्रत्येक देशातील सरकारचे बाकीच्या बाबी ह्या दुय्यमच .

या आधीही अश्या परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा आपल्या नागरिकांना कुठल्याही प्रसिद्धिविना व विनाविलंब मायदेशी सुखरूप आण्यात आले . सरकारच्या चुकीची शिक्षा त्या विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबास मिळू नये .
देशातील अनेक सजग असलेले लोक सावध करत असतात की , सरकारच्या चुकीच्या धोरणांची कार्याची शिक्षा आमच्या पुढच्या पिढीस भोगावी लागेल . युक्रेन मध्ये अडकलेले निष्पाप विद्यार्थी पाहुन असं वाटते त्याची सुरुवात झाली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.