गजानन सोनटक्के जळगाव जा – वंचीत बहुजन आघाडी जळगांव जा च्या वतीने दि. ०६/०८/२०२१ ला नागरीकांच्या समस्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात जुलै महीन्यात अतीवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. शेतजमीन भरडुन गेली. शेतातील पिके नेस्तनाबुत झाली. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात शेतीत ऊसाचे पिक वाया गेले. शेतात सुपीक मातीच राहली नाही. शेतकरी व शेतमजुर आर्थीकदृष्ट्या खचुन गेलेत. परीणामी पुरग्रस्त उस उत्पादक शेतकरी ज्या साखर कारखान्याचा सभासद आहे त्या कारखान्यानी शेतक-यास उचीत आर्थीक मदत द्यावी.

पुरग्रस्त नागरीकांना जिवन जगण्यासाठी आवश्यक सुवीधांची तात्काळ पुर्तता करावी. शेतक-याच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना वाढीव मदत द्यावी. दुबार पेरणी शक्य नसलेल्या ठिकाणी शेतमालाच्या बाजारमुल्या प्रमाणे एकरकमी मदत जाहीर करावी. ज्यांची घरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.पुराच्या पाण्यात नागरीकांची महत्वाची कागदपत्रे जसे आधार कार्ड , रेशनकार्ड , मतदान कार्ड , शैक्षणीक दाखले हे सर्व मिळण्यासाठी शासकीय स्तरावर एकाच ठिकाणी विनामुल्य व्यवस्था करावी. पुरग्रस्त भागात साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाय योजना कराव्यात.
तसेच जळगांव जा. तालुक्यातील शेतक-यांची पिक कर्जाची प्रकरणे बॅंकांमधे प्रलंबीत आहेत करीता बॅकांना आदेश देवुन तात्काळ पिककर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश बॅंकाना द्यावे. ब-याच शेतक-यांनी दुबार पेरणी केलेली आहे अशा शेतक-यांना पंचनामा करुन हेक्टरी मदत द्यावी. सन २०२०-२१ वर्षातील पिकविम्याची रक्कम सरसकट विनाविलंब शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. कोरोना काळातील घरघुती व शेतीचे विजबिल माफ करण्यात यावे अशा विवीध रास्त मागण्यांसाठी वंचीत बहुजन आघाडी जळगांव जा. च्या वतीेने शासनाला तहसीलदार साहेब जळगांव जा. यांचे मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी जेष्ठनेते रामकृष्ण रजाने माजी राज्यसचीव , बाबुराम तायडे माजी अध्यक्ष , नारायण पवार , मधुकर भगत , सुगदेव वानखडे , तालुकाध्यक्ष संतोष गवई , ज्ञानेश्वर कोकाटे , प्रदीप मोरखडे , विजय सातव सचीव , विशाल तायडे शहराध्यक्ष , विजय सोनोने , राजाराम पवार , बाबुराव पवार , विलास इंगळे , राहुल धुंदाळे , मंगेश करांगळे , साहेबराव वानखडे , विनोद वानखडे , योगेश वानखडे , अश्विन वानखडे , गौतम वाकोडे , धम्मदिप धुंदाळे , दिनकर इंगळे , ओंकार इंगळे , चिंतामण मांडोकार , रामदास दामोदर ,अंबादास पारवे , संजय इंगळे , सुनिल इंगळे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतांना हजर होते.