Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

भाजपा मेरा खुर्द सर्कल च्या वतीने विनोद वाघ यांचा सत्कार.

vinod wagh

मेरा खुर्द. रवींद्र सुरुशे – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांची नुकतीच भाजपा महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते पदी निवड झाली आहे या निमित्ताने मेरा खुर्द सर्कल भाजपा च्या वतीने त्यांचा विश्राम गृह मेरा खुर्द येथे सत्कार करण्यात आला, विनोद वाघ यांचा आगमन होताच मेरा फाट्यावर,फटाक्यांची आतिषबाजी ने त्यांचा स्वागत करण्यात आला,सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या ला अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात झाली,या वेळी विनोद वाघ यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाले की पक्षाने माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला जे मान सन्मान दिला प्रदेश प्रवक्ता म्हणून निवड केली,मी सर्व कार्यकर्त्यांना दोबत पक्षाचे ध्येय धोरणे,केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवणार,पक्षा ची भूमिका भर भक्कम पणे मांडणार व दिलेली संधी चा सोना करणार,स्वागत सत्कार झाल्यावर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनस्वी आभार मानले..या कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ नेते.मधुकर वाघ.देऊळगाव घुबे चे माजी सरपंच तथा भाजपा तालुका सरचिटणीस.मधुकर पाटील घुबे.मेरा खुर्द भाजपा सर्कल प्रमुख.राजीक शाह.अंत्री खेडेकर माजी सरपंच किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष.दिलीप खेडेकर.रंगनाथ वरपे.बबन इंगळे.ग्रामपंचायत सदस्य देऊळगाव घुबे.दीपक घुबे.शिवाजी वाघ.संदीप बोर्डे.दीपक उदार.रमेश अवचार.दीपक शेटे.पप्पू पडघान.विठ्ठल कट्टे. गोविंद हटकर.हुसेन बडे.पंकज बिथरे.सुरेश शिवरकर.व मेरा खुर्द सर्कल मधील शेळगाव आटोळ.मुरादपूर. अमोना.इसरूळ.भरोसा.पिंपळवाडी.आंचरवाडी.मलगी.येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम सर्कल प्रमुख राजीक शाह यांनी आयोजित केले होते..

Leave A Reply

Your email address will not be published.