Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

वाघ दात व वन गुन्हा कामी वापरण्यात आलेली अवजारा सहित एकास अटक

गजानन सोनटक्के जळगाव जा – दिनांक 13/7/2021 रोजी मोताळा वनपरिक्षेत्रातील मौजे नांदुरा येथे वन्य प्राणी बिबट /वाघ नखे व दात तस्करी करणाऱ्या टोळीचीगुप्त माहिती मिळाल्यावरून बुलढाणा वनविभाग वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो मुंबई व मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम ब्रँच अमरावती यांनी संयुक्तरित्या कारवाई करून वन्य प्राणी बिबट/वाघ नखे तस्करीप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती

wagh

व वन गुन्हा प्रकरणी चौकशी दरम्यान प्राप्त माहितीनुसार मुक्ताईनगर व जळगाव जामोद येथील आणखी दोन आरोपीस दिनांक 15 /7 /2021रोजी अटक करण्यात आली होती सदर गुन्ह्याची चौकशी दरम्यान आज 16 /7/ 2021 रोजी वनविभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या मौजे सुनगाव तालुका जळगाव जा दोन ठिकाणी धाड टाकून वन्य प्राणी बिबट/वाघ चे दात व वन गुन्हा कामीवापरण्यात आलेली अवजारे जप्त करण्यात आली सुनगाव येथील एक आरोपीस अटक करण्यात आली आहे .

सदर कारवाई माननीय उपवनसंरक्षक बुलढाणा वनविभाग श्री अक्षय गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली सदर कारवाईमध्ये जळगाव जामोद साहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे व कर्मचारी तसेच मोताळा खामगाव व जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील कर्मचारी यांनी सहभाग घेतला सदर घटनेचा पुढील तपास माननीय उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांचे मार्गदर्शनाखाली श्री रणजीत गायकवाड सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा व नेहा मुरकुटे वनपरिक्षेत्राधिकारी मोताळा हे करीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.