Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

निरोगी, सुदृढ व दीर्घ आयुष्यासाठी दररोज योगा करावा -आमदार संजय गायकवाड

बुलडाणा दि.21 : दररोज योगा केल्याने आरोग्य उत्तम व निरोगी राहते.  तर दुर्धर आजारांवर सुध्दा मात केल्या जाऊ शकते.  योग हा निरामय आयुष्याचा सच्चा साथीदार, योगामुळे मन व शरीर शुध्द करुन सुदृढ आयुष्य जगता येते.  तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मक जगता येते. त्यामुळे दररोज योगा करावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी आज केले.

     जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम नाशिक, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन 2021 रोजी सकाळी 7.00 ते 7.45 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे ऑनलाईन 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले.

YOGADIVAS

याप्रसंगी सर्वप्रथम आमदार संजय गायकवाड यांनी भारताचे महान ॲथलीट, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे, 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकणारे, 1960 च्या ऑलीम्पीकमध्ये 400 मी. या बाबीमध्ये अंतीम फेरीत चवथे स्थान प्राप्त करणारे, पद्मश्री पुरस्काराने गौरविल्या गेलेले महान धावपटु स्व.मिल्खासिंग यांच्या प्रतीमेस हारअर्पण करुन उपस्थित सर्वांच्या वतीने सामुहीक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे,  शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी श्री.जैन, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंग राजपुत, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक सुभाष आठवले, डॉ.राजेश्वर उबरहंडे आदी उपस्थित होते.  यावेळी उपस्थित योग शिक्षीका सौ.अंजली परांजपे यांनी योग गिताचे सादरीकरण केले तसेच योग प्रार्थना सादर केली.

तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सदर 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी प्रात्यक्षीक सौ.अंजली परांजपे, प्रशांत लहासे व सचिन खाकरे यांनी सादर केले.  या कार्यक्रमात उपस्थितांना योग पुर्व व्यायाम प्रात्यक्षीकासह तसेच प्राणायम, कपालभाती, अनुलोम विलोम, हे प्रकार करुन घेतले.  त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली.  शेवटी सौ.अंजली परांजपे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने योग दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  सदर ऑनलाईन कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पालक, योगप्रेमी नागरीक या ऑनलाईन गुगल मिट लिंक, फेसबुक पेज लाईव्ह, यु ट्युब चॅनलवर कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  याप्रसंगी उपस्थितांना गणेश प्रभाकर जाधव, जुग्गत फार्मा यांचेकडून एनर्जी ड्र्रींक्सचे वाटप करण्यात आले.

सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे संचलन रविंद्र धारपवार,  क्रीडा अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. याप्रसंगी नेहरु युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, ए.एस.पी.एम.महाविद्यालयाचे प्रा.प्रमोद ढवळे, प्रा.कैलास पवार, अन्न व औषध विभागाचे श्री.घिरके, गोविंदा खुमकर, विजय वानखेडे तसेच योगप्रेमी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऑनलाईन तांत्रीक बाबीकरीता कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, अक्षय कराड, नवनाथ कारके तसेच कार्यालयातील जिल्हा संघटक गाईड सौ.मनिषा ढोके, विजय बोदडे वरिष्ठ लिपीक, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.