बुलडाणा दि. ३ -: जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात दिनांक १ जुलै २०२१ रोजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन म्हणुन साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सन २०२० च्या रब्बी हंगाम पिक स्पर्धेत विजेते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मनिषाताई पवार, जि. प उपाध्यक्ष सौ. कमलताई जालिंधर बुधवत, जि.प.चे कृषि व पशुसंवर्धन सभापती राजेंद्रभाऊ पळसकर , समाज कल्याण सभापती सौ. पुनमताई राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संजय चोपडे, कृषि विषय समिती सदस्य महेंद्र गवई , जिल्हा परिषद सदस्य सौ. गोदावरीताई भगवान कोकाटे व विविध विभागाचे खाते प्रमुख व अधिकारी उपस्थित होते. जिल्हयामध्ये शेतीच्या विकासामध्ये नाविन्यपुर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा व शेतीला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी या करीता जिल्हा परिषद कृषि विभाग यांचे वतीने कै. वसंतराव नाईक यांचे जयंतीनिमीत्त कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन २०२० च्या रब्बी हंगाम पिक स्पर्धेत विजेते प्रगतीशील शेतकरी भगवान कोकाटे, सौ. कोकाटे, भगवान बाजड, श्री. घाटे आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते मका पीकावरील लष्करी अळीचे नियंत्रण बाबतचे भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. सभापती राजेंद्रभाऊ पळसकर यांनी उपस्थितांना शेतीविषयक मार्गदर्शन करुन शेतक-यांचे अभिनंदन केले. तसेच जि.प. अध्यक्ष सौ. मनिषाताई पवार यांनी अध्यक्षिय भाषण केले. कार्यक्रमाचे शेवटी कृषि विकास अधिकारी अनिसा महाबळे यांनी सर्व सन्माननिय उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे नियोजन सी. एन. पाटील, जिल्हाकृषि अधिकारी व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय खोंदील , मोहिम अधिकारी यांनी केले.
Related Posts