Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत उमेदवारांची नोंदणी सुरू

AAROGYA

बुलडाणा दि. ३ -: आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ  उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या १८ ते ४५ वयोगटातील युवक-युवतींसाठी हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक वर्कर क्षेत्रामध्ये  प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.   यासंदर्भात  जिल्ह्यातही सदर योजनेअंतर्गत  मोफत  प्रशिक्षण मिळणार आहे. या प्रक्षिणासाठी इच्छुक उमेदवारांनी https://forms.gle/mraSmvjzK7J3Gj5Y9 या लिंकवर उपलब्ध फॉर्म मध्ये आपली माहिती सादर करावी. हा फॉर्म मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम : उमेदवार नोंदणी फॉर्म नावाने आहे.  याप्रकरणी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय इमारत, बस स्टँड समोर बुलडाणा या ठिकाणी किंवा दूरध्वनी क्रमांक : 07262242342 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात येत आहे.   

Leave A Reply

Your email address will not be published.