Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि आपली जबाबदारी

ऍड. योगेश जायभाये – संपुर्ण महाराष्ट्रातील सामान्य लोकांचे लाईफलाईन समजल्या जाणारे “जिल्हा सामान्य रुग्णालय” म्हणजेच ग्रामीण रुग्णालय,तसेच महानगरपालिका,
नगर पालिकेच्या सर्व रुग्णालयाचे ऑडिट करून, गोरगरीब लोकांच्या आरोग्यासाठी राज्य सरकारने काम करणे आता किती गरजेचे आहे, हे लक्षात येत आहे.!
राज्य सरकार यांनी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी किती पैसे खर्च करते…?
त्याचे रुग्णालयात कितपत योग्य नियोजन होते.?
रुग्णालयात पुरेसे डॉक्टर, नर्स, यांचा स्टाफ तसेच औषधी, ऑक्सिजन, बेड व इतर पुरक व्यवस्था आहेत का.?
हे बघण्यासाठी पारदर्शक ऑडिट होणे गरजेचे आहे..
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून, आता तरी राज्य सरकारने सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक बाबींचा विचार करून लोकांची आरोग्य व्यवस्था किती महत्त्वाची आहे हे लक्षात घेवुन, येणाऱ्या पुढील काळात उपाय योजना आखणे गरजेचे आहे.

aarogya vyavastha
  खाजगी हॉस्पिटलचा सुळसुळाट, रुग्णांची आर्थिक पिळवणूक,

या गोष्टी जर थांबवयाच्या असतील तर, सरकारी रुग्णालयात पुरक आरोग्य व्यवस्था देणे गरजेचे आहे..सामान्य नागरिकांना सुद्धा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी जाण्याची इच्छा का होत नाही..? जास्तीचे पैसे देवून नागरिक खाजगी रुग्णालयात का जातात..?
याचे आत्मचिंतन सरकारने करावे, जेणेकरून येणाऱ्या पुढील काळात तरी अनेक सामान्य लोकांचे प्राण आपण वाचवु शकू..
सरकार कुठल्या पक्षाचे आहे..? मंत्री कोण आहेत..? किंवा भाजपने काय केले..? इतर राष्ट्रवादी, काँग्रेस,शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पक्षाने काय केले..?
या बाबतीत वृत्तवाहिन्यावर आरोप-प्रत्यारोप न करता,
उपाय योजना करून सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळणे गरजेचे आहे..
एकीकडे आपण सुद्धा इतके व्यक्ती केंद्रीत होत आहोत की, आपल्याला घराच्या बाहेर निघताच, आपले पणाची भानवा नाहीशी होत चाललेली आहे.. जसे की कुठलीही सार्वजनिक गोष्ट असो, मग ते सरकारी हॉस्पिटल, बसस्थानक, रेल्वे स्थानक, रस्ता, काहीही असू द्या..
एखादी गोष्ट चुकीची त्याठिकाणी घडत असल्यास आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून, ” आपल्याला काय करायचे ” आपणच एकट्याने करून जग बदलनार आहे का..? असे विचारशून्य वाक्य वापरून डोळ्यासमोर घडणारे भ्रष्टाचार असो, की इतर गुन्हा , किंवा स्वतःवरील अन्याय सुद्धा मूकगिळून सहन करतो कारण आपल्याला व्यवस्था आपली वाटत नाही. जसे की आपले घर आपले वाटते.
आणि खरी गफलत इथेच होवून पुढे देशात, राज्यात काय घडत आहे आपण बघतच आहोत ते सुद्धा उघड्या डोळ्यांनी…
यापुढे सुद्धा या व्यक्तीकेंद्रित पणामुळे आपले अनेक नुकसान होणार आहेच.कारण कोरोना सारख्या महामारी किंवा अन्य कुठलेही आजारां साठी सरकार सोबत आपण सुद्धा जागे होणे गरजेचे आहे..
जर असेच आपण वागत राहिलो तर पुढील काळ हा यापेक्षा ही भीषण असेल यात शंका नाही..
आज कोरोनाचे संकट आहे उद्याला आणखी दुसरे काही संकट असेल..
बाकी आपण समजदार आहातच..

Leave A Reply

Your email address will not be published.